Thursday 29 September 2011

आपत्ती व्यवस्थापन जनजागरण पंधरवड्याचा जिल्ह्यात आरंभ


   महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
  वर्धा,दि.29- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे शक्य व्हावे याकरिता तसेच याबाबत जनजागरण करण्याच्या हेतूने साज-या करण्यात येणा-या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पंधवड्याला बुधवार दि.28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सुरुवात झाली. हा पंधरवडा 12 ऑक्टोंबर पर्यंत चालेल.
     नैसर्गिक व मानव निर्मीत आपत्तींना सातत्याने सामोरे जावे लागते. या आपत्तीमुळे जिवित हानी शिवाय शेती मालमत्ता तसेच मुलभुत सुविधांचे (उदा.रस्ते, पुल, शाळा, दवाखाना, पाणीपुरवठा योजना इ.) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपत्तीचे वाढते स्वरुप व प्रकार लक्षात घेता अशा आपत्तींचा समर्थपणे सामना करण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंमलात आणला आहे. या अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची स्थापना केलेली आहे.
     राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धापन दिवस दि.   28 सप्टेंबर 2011 ला तसेच संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ऑक्टोंबर महिन्याचा दुसरा बुधवार आपत्ती न्युनिकरण दिवस म्हणुन साजरा करण्याचे जाहिर केले आहे. यावर्षी हा दिवस दि. 12 ऑक्टोंबर 2011 रोजी साजरा होणार आहे. या दोन्ही दिवसाचे
     महत्व लक्षात घेता दि. 28 सप्टेंबर 2011 ते दि. 12 ऑक्टोंबर 2011 हा पंधरवाडा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होण्याबाबत जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी आवाहन केलेले आहे.
     दि. 30 सप्टेंबर ला संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 1 ऑक्टोंबरला पोस्टर स्पर्धा दि. 2 ऑक्टोंबर रोजी आर्वी तहसिलमध्ये मॉक ड्रिल,दि.3 ऑक्टोंबरला जिल्हास्तरावर वकृत्व स्पर्धा शिक्षणाधिकारी यांचे माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे.
     दि. 5 ते दि. 11 ऑक्टोंबर दरम्यान प्रत्येक तहसिल व नगर परिषद स्तरावर आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पथनाट्य व भिंतीचित्र कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक पथक यांचे सहभागाने आयोजित केलेले आहे. दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता विकास भवन येथुन भव्य रॅलीचे आयोजन असून सदर रॅलीमध्ये बँडपथकासह पथनाट्य सादर करण्यात येईल.
रॅली विकास भवन ते जिल्हा डाक घर व परत विकास भवन याप्रकारे पोलीस विभाग, एनएसएस, एनसीसी, समाजकार्य महाविद्यालय, नेहरु युवा केंद्र, स्वंयसेवी संस्था व स्वंयसेवक पथक यांचे सहभागाणे आयोजित असून समारोपीय कार्यक्रमात बक्षीस व प्रमाणपत्र वितरण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आयोजन करण्यात येत असून सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment