Friday 30 September 2011

ऑक्टोंबर महिण्यातील लोकशाही दिन 10 ऑक्टोंबर रोजी


                   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि. 1 ऑक्टोंबर2011
------------------------------------------------------------------------------

     वर्धा, दि.1- शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात 3 ते 5 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत पटपडताळणीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा या कामात व्यस्त असल्याने ऑक्टोंबर 2011 महिण्याचा लोकशाही दिन   दि. 3 ऑक्टोंबर 2011  ऐवजी सोमवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2011 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येईल.
या बदलाची नोंद जिल्ह्यातील नागरीकांनी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment