Saturday 1 October 2011

नविन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उघडण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित


                                             महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 30 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------   
वर्धा,दि.30-खाजगी, शासनाचे उपक्रम, मालकीचे कंपनी क्टखाली नोंदणीकृत किंवा स्पेशल एकॉनॉमी झोनचे प्रमोटर्स किंवा सोसायटी किंवा ट्रस्टखाली नोंदणीकृत इच्छूक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
     यामध्ये कायम विनाअनुदान तत्वावर नविन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी. विद्यमान औ. प्र. संस्थात नविन व्यवसाय किंवा जादा तुकडी सुरु करण्यासाठी. विद्यमान खाजगी कायम विना अनुदानीत औ.प्र.संस्थात सुरु असलेल्या व्यवसायांना डी.जी.ईटी. नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त आहे ( प्रथम व तिसरी तुकडी) व त्यांना दुस-या पाळीत दुसरी व चौथी तुकडी सुरु करण्यासाठी). ज्या विद्यमान खाजगी कायम विना अनुदानीत औ.प्र.संस्थांना सन 2008 मध्ये अ दर्जा प्राप्त झालेला असून दुस-या पाळीत व्यवसाय प्रशिक्षणसुरु आहे अशा औ.प्र.संस्थांना तिस-या पाहीत व्यवसाय प्रशिक्षण सुरु करण्यासाठी. अनुदानित, विना अनुदानित,अभियांत्रिकी महाविदृयालये, तंत्रनिकेतने यामध्ये कायम विना अनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्‍यासक्रमाची दुसरी पाळी सुरु करण्यासाठी. नविन खाजगी औ.प्र.संस्था सुरु करताना किंवा विद्यमान औ.प्र.संस्थात नविन व्यवसाय, जादा तुकडी सुरु करतानासंस्था एकाच व्यवसायाच्या 2 तुकड्यांकरीता एकत्रित अर्ज करणे आवश्यक आहे. उदा. जोडारी 1 ली व 2 री तुकडी, विजतंत्री 1 ली व 2 री तुकडी यांचा समावेश आहे.
     विहित नमून्यातील अर्जाची किंमत 500 ( ना परतावा) एवढी असून अर्ज करण्याची अंतीम तारीख 15 नोव्हेंबर 2011 आहे व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतीम तारीख 30 नोव्हेंबर आहे.
     इच्दूक नोंदणीकृत संस्थानी अर्जाचा नमूना, पात्रतेच्या अटी, अर्ज करण्याची पध्दती, अर्जावर होणारी कार्यवाही व इतर सविस्तर माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व विहीत मुदतीत अर्ज सादर करावा तसेच विहत मुदतीनंतर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी व यापुर्वी केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. असे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी वर्धा कळवितात.
                          000000

No comments:

Post a Comment