Wednesday 28 September 2011

शालेय पटपडताळणीची तयारी वेगात


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.28 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
     
वर्धा,दि.28-वर्धा जिल्ह्यात 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हजेरीपटाची तपासणी होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी दिनांक 3 ते 5 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत करण्यात येणार आहे. या पटपडताळणीसाठी एकुण 150 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकामध्ये वर्ग 1 व वर्ग 2 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली असून या पथकांसाठी एकुण 150 वाहने अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.
     या पथकाव्यतिरीक्त महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महसूल व तहसिलदार यांचे एकुण 13 भरारी पथकांव्दारे मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रण राहणार आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातंर्गत/जिल्हाबाहेरुन विद्यार्थ्यांची वाहतून होण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा वाहतूकीवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये प्रतिबंध घातलेला आहे. अशा वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रादेशिक परिवहन आधिकारी, अप्पर जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांचे समवेत तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हाधिका-यांनी जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक ती नाकाबंदी करणे व विशेष पथके नियुक्त करणेबाबत आदेशीत केलेले आहे.
या पटपडताळणी मोहीमे दरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास संबधित वाहन मालक/चालक, संस्था चालक, मुख्याध्यापक व संबधित विद्यार्थी यांच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यईल असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
     3 ते 5 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत होणा-या पटपडताळणीसाठी सर्व शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षण,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हजर ठेवावे व पटपडताळणी मोहीमेस सहकार्य करावे असे अवाहन जिल्हाधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                     00000

No comments:

Post a Comment