Wednesday 28 September 2011


विशेष लेख     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 28 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------------
नवरात्र हा दुर्गा पुजनाचा काळ. दुर्गा ही शक्ती देवता आहे. या काळात केवळ रास गरबा किंवा जागरण होते असं नाही तर हा एक मोठा महोत्सव असतो. समाजात दुर्गेचं स्थान असणा-या नारी शक्ती बाबत या निमित्तानं मंथन व्हावं या उद्देशानं ही खास लेखमाला.
                                        प्रशांत दैठणकर
_____________________________________________

क्रीडा क्षेत्रातील महिला...!
तेजस्विनी सावंत
     मधू सप्रे या महाराष्ट्रीयन सुंदरीचं विश्वसुंदरीचं पद एका प्रश्नाच्या उत्तराश्ने गेलं आणि तो प्रश्न विचारल्यावर तिनं उत्तर दिलं होतं भारताला ऑलिम्पिकच सूवर्णपदक मिहवता यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात तिचं जेतेपद हुकलं तरी तिची कळकळ प्रमाणिक होती याची जाण समस्त भारतीयांना झाली 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तिचं हे स्वप्नं, खरं म्हणजे प्रत्येक भारतीय मनातल हे स्वप्न अभिनव बिन्द्राने नेमबाजीत पूर्ण केलं. त्याच सुमारास क्रीडा क्षेत्रात महिलांचा दबदबा देखील आता जाणवायला लागला आहे.
सानिया
ड़ें     मुली आणि खेळ हे नातं आपल्याकडे फार काळापासून नाही त्यामुळे या क्षेत्रात वाटचालही फारशी नव्हती मात्र गेल्या दशकभरात हे चित्र बदललं आहे. ब्रिटिशांनी आपल्याला क्रिकेटचं वेड लावलं मात्र तिथ आपल्या देशात त्यांनी सर्वच खेळांना जपलय आपल्याकडे फक्त क्रिकेट एके क्रिकेट असा प्रकार झाल्यानं इतर खेळांकडे दुर्लक्षच झालं सुदैवानं आता चित्र बदलत आहे.
     आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला खेळाडूंमधून भारताचं नाव उल्लेखनीयरित्या पुढे आणण्याचं काम केलं ते टेनिसपटू सानिया मिर्झाने जगभरातील माध्यमांनी तिची चांगली दखल घेतली आणि त्याच प्रेरणेतून अनेक मुली क्रीडा प्रकारांकडे वळलेल्या दिसतात.
सायना नेहवाल
ास
     सानिया मिर्झा नंतर त्याही पेक्षा उच्च कामगिरी करण्याचा मान अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ने प्राप्त केल. या खेळात तिने सर्वच मर्यादा ओलांडत जगज्जेतेपद मिळवलंय तिचीही प्रेरणा घेताना अनेकजण आपणास दिसतील महाराष्ट्राची नेमबाज तेजस्वीनी सावंतही कौतूक करावं लागेल.
     मुळात खेळाकडे बघण्याचा औद्योगिक घराण्यांचा तसेच सरकारचा दृष्टीकोण बदलला असल्याने या क्षेत्रात हा भरीव असा सकारात्मक बदल दिसत आहे. खेळासाठी राखीव गुण ठेवणे ज्याच सोबत गुणवंताना रोख पुरस्कार देणे यामुळे आता सारे इतर क्रीडा प्रकारांकडे वळत आहेत. या स्थितीत त्यांना दर्जेदार क्रीडा साहित्य आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ते पूर्णपणाने मिळाले तर भारतात नैपूण्याची कमतरता नाही त्यामुळे योणा-या काळात मुली या क्षेत्रात करिअर करु शकतील अशी खात्री वाटते.
पी. टी.उषा
     पी.टी.उषाची परंपरा चालविणा-या अनेक गुणवंत महिला खेळाडू भारतात आहेत त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले तर ते अमेरिकन ऑलिम्पिक मधलं सेकंदाच्या हजाराव्या भागाच्या फरकानं गमावलेलं एकच काय तर अशा अनेक पदकांची लयलूट येणा-या काळात भारतीय महिला खेळाडू करतील हे नक्की आहे.
-प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment