Saturday 1 October 2011

सोयाबिन पिकाच्या रक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन


 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.1 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------
     वर्धा,दि.30- सोयाबिन हे पिक शेंगा भरण्याच्या अत्यंत संवेदनशिल अवस्थेत असून पंधरा दिवस या पिकावर कोणत्याही प्रकारची अटी अथवा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. शेतक-यांनी सोयाबिन पिकावर हिरवी ऊंटअळी अथवा तंबाखुची पाने खाणारी अळी पासुन त्वरीत उपाय योजना करणे आवश्यक आहे.
      हिंगणघाट उपविभागत समुद्रपूर व हिंगणघाट मिळून या  क्षेत्रावर सोयाबिनचे पिक आहे. सध्या हे पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून अजून सोयाबिन पुर्णपणे तयार होण्यास 15 ते 25 दिवसाचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत किडीचा प्रादुर्भाव झालयास सोयाबिनचे पिक नष्ट होण्याचा धोका उदभवू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी त्वरीत उपाय योजना करुन पिकाचे रक्षण करावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.
     सोयोबिन, कपाशी या पिकावर तसेच इतरही फळझाडे पिकावर सतत पाऊस असल्यामुळे विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे किडीचे व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. सोयाबिन पिकाची पाहणी शेतक-यांनी दररोज करावी. या पाहनी मध्ये तंबाखुचे पाने खानारी अळी अथवा ऊंटअळी 3 ते 4 जरी आढळल्या तरी त्यावर त्वरीत फवारणी करावी.
     सायोबिनला शेंगा भरण्याच्या अवस्थेत पुरक अन्न द्रव्य मिळावे यासाठी डि.ए.पी.ची फवारणी करावी. तसेच सारख्या सुरु असलेल्या पावसामुळे पाणी बाहेर जाण्यासाठी उपाय योजना करावी. अळयांपासून संरक्षणासाठी क्विनॉलफास किंवा  झाडीक्टोन किंवा फेनव्हलरेट याची फवारणी करावी. कामगंध सापळे लावावे. याकरीता नजिकच्या कृषि सहाय्यकाशी संपर्कात राहावे तसेच पक्षि थांबे उभारावेत.कपाशीवरील रसशोषनं करणारी पांढरी माशी ही किड आढळून आल्यास ट्रायझोफास्ट किंवा डायमेथोयेट याची फवारणी करावी.
                           00000

No comments:

Post a Comment