Friday 30 September 2011

नंदोरी चौकाचे शहिद चंद्रशेखर असे नामकरण


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 30 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------
           
वर्धा, दि.30- हिंगणघाट शहरातील अत्यंत व्यस्त असलेल्या नंदोरी चौकाला नक्षली चळवळीमध्ये शहिद झालेला चंद्रशेखर कोरे यांचे नांव देण्यात आले असून यापुढे या चौकाला शहिदचंद्र शेखर चौक म्हणून संबोधण्यात येईल. या चौकात लावण्यात आलेल्या शहिद चंद्रशेखर कोरे यांच्या फलकाचे अनावरण कामगार व विशेष सहाय्य मंत्री राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
     याप्रसंगी नगराध्यक्ष सुधीर कोठारी , पंचायत समिती सभापती इंदिराताई उरकुडकर, न.प. मुख्याधिकारी प्रशांत रसाळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, डॉ.पी.जी. खोब्रागडे, सुरेश कोरे आदी मंचावर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना कामगार मंत्री मुश्रीफ म्हणाले की शहिद चंद्रशेखर कोरे यांनी देशासाठी बलीदान देवून अमर झाले. त्यांच्या स्मृती सतत तेवत राहाव्या यासाठी नगर परिषदेने या चौकाला शहिद चंद्रशेखर कोरे यांचे  नाव देवून महतवपूर्ण कार्य केले. त्यांचे कुटूंब त्यांच्यावर अवलंबित असल्यामुळे त्यांच्या भावाला विशेष बाब म्हणून गृह विभागात नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल.देण्याचे आश्वान दिले. तसेच त्यांची निवासाची जागा अतिक्रमणात येत असल्यामुळे ते 1995 पूर्वीचे असल्यामुळे नगर पालीकेने घराचा पट्टा घ्यावा अश्या सुचना केल्या.देण्याच्या सुचना केल्या.
     यावेळी सुरेश वाघमारे, राजू तिमांडे, डॉ.पी.जी. खोब्रागडे, अड.सुधीर कोठारी यांनी स्व. कोरे यांच्या कार्याचा उजाळा देवून त्यांच्या कुटूंबातील त्याच्या भावाला शासकिय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केल्या जातील अशा  भावना त्यांनी व्यक्त केल्या.
            तत्पूर्वी कामगार मंत्री मुश्रीफ यांनी शहिद कोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे वडील सुरेश कोरे,भाऊ रवि कोरे आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थने विचारपूस करुन शोक संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे समवेत आमदार राजू तिमांडे व समाजसेवक अनिल भोंगाडे होते.
     या कार्यक्रमाचे संचलन व आभार राजू अवचट यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने न.पा.सदस्य, पदाधिकारी तथा परिसरातील नागरीक उपस्थित होते.
                            000000


No comments:

Post a Comment