Thursday 21 April 2016

भारतीय संविधान, ग्राम गीतेचा अभ्यास करा
-         वसंतराव आंबटकर
Ø नी.मु.घटवाई विद्यालयात गुणवत्ता विकास प्रदर्शनी
Ø परसबाग, बीज संकलन, पर्यावरण पूरक प्रकल्पाचे सादरीकरण
            वर्धा, दिनांक 12 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. भारतीय संविधान, ग्रामगीतेचे प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन करावे. त्यामुळे ज्ञानात भर पडून अभ्यास, मनन आणि चिंतनाने आत्मिक समाधान लाभेल जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर यांनी केले.
            वडनेर येथील नीळकंठ मुरार घटवाई विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात गुणवत्ता विकास प्रदर्शनीच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर होते. कार्यक्रमास शाळेचे तथा लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डागा, नयी तालिमचे अनिल फरसोले, शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, केंद्र प्रमुख विजया ढगे, समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळचे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मायकेल फ्रान्सिस, नी.मु.घटवाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोविंद नाहाते, पत्रकार अजय मोहोड, विद्यालयाचे प्राचार्य राजेश सातपुते आदींची उपस्थिती होती.
             सभापती वसंतराव आंबटकर म्हणाले, नी.मु. विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याने या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे. महादेवराव शेंडे, भांडारकर, कै.स्व. डागाजी  यांनी या शाळेचे पालकत्व स्वीकारून शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना यशोशिखरावर पोहचविले. शिक्षकांच्या मेहनतीने विद्यालयाचे नावलौकिक झाले. आजही विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचे मला समाधान वाटते.
            जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी विद्यार्थ्यांना जिद्द परिश्रमाने यश नक्कीच मिळते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द परिश्रमाने विविध पुस्तकांचे वाचन करावे. संस्थेचे नाव अजून नावारूपास आणावे, असे आवाहन केले.
               शाळेचे माजी विद्यार्थी सभापतीपदी निवड झाल्याने श्री. आंबटकर यांचा संस्थेच्यावतीने मानपत्र, शाल श्रीफळ देऊन श्री. डागा यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांचाही शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाभारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यातून गुणवत्ताप्राप्त केलेल्या शिवानी अवचट हिचा प्रमाणपत्र, पदक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांचे प्रतिमा पूजन दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र गोडे यांनी केले. आभार पी.डी.साखरकर यांनी मानले. सरस्वती स्तवन साक्षी वानखेडे चमू आणि स्वागत गीत, स्वागत गीत पल्लवी मानकर, ऐश्वर्या भातकुलकर, वसुधा कामडी, आचन कागडे, प्रिती दिवे, श्रीमती धामणकर यांनी गायले.
           कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक तुराळे, प्रशांत बोरकर, उमेश गौर, रवींद्र मुक्कावार, प्रिती चाफले, अलका मराठे, रेडलावार, दीपक चौधरी, श्री. गुजरकर, टिपले, झाडे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांच्या प्रयोगांनी वेधले लक्ष
                गुणवत्ता विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग, बीज संकलन, पर्यावरण पूरक  प्रकल्पाचे वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये विद्यार्थी प्रणव कुरसंगे या विद्यार्थ्याने विणलेले लोकर, तेलबिया, भाजीपाला, कडधान्याबाबत तृप्ती मांगरूटकर, कोमल तपासे हिने यिांचे वर्गीकरण, साक्षी ठाकरेने परसबाग, आस्था उईकेने दंत मंजन निर्मिती, शीतल उमाटेने गणितीय संकल्पना तर आजनसरा तीर्थ क्षेत्रासंबधी प्रकल्पाबाबत विद्यार्थीनी कल्याणी सुरकार आदी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सभापती वसंतराव आंबटकर यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक केले.

00000

No comments:

Post a Comment