Thursday 21 April 2016

शेतक-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार
Ø जिल्हास्तरीय समितीची बैठक
Ø आठ शेतकरी आत्महत्याप्रकरणे मंजूर
            वर्धा, दिनांक 07 – नैराश्यातील शेतक-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून शेतक-यांना येणा-या अडचणीवर मात करण्यासाठी मदत करण्यासोबतच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागप्रमुखांनी पुढाकार घेण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी दिल्यात.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, देवळी पंचायत समितीचे भगवान भरणे आर्वी पंचायत समितीच्या सभापती तारा तुमडाम तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. देशपांडे, डॉ. नितीन निमोदिया, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा, तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
             शेतकरी आत्महत्यासंदर्भातील जिल्ह्यात फेब्रुवारीपासून झालेल्या आठ प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन 7 आत्महत्या पात्र ठरविल्या आहेत.  यामध्ये वर्धा तालुक्यातील करंजी भोगेच्या विशाल अंबादास पवार, धानोरा येथील आशीष नरेश चौधरी, वाटोडा धामणगाव येथील संदीप वाटकर, हिंगणघाट तालुक्यातील येरल्याच्या श्रीमती मंजुळा ताजने, देवळी तालुक्यातील इंझाळ्याचे भावना शरद डहाके, पळसगाव येथील अरूण विठोबा ढोके, कारंजा तालुक्यातील बोरीच्या सुंदराबाई धनराज बैगने या आत्महत्या केलेल्या शेतक-यांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
             शेतकरी आत्महत्या प्रकरणासोबतच शेतक-यांना सिंचनासाठी विजेचा नियमित पुरवठा तसेच प्रलंबित असलेली वीज जोडणी प्राधान्याने देण्याची सूचना समितीच्या सदस्यांनी केलीवनक्षेत्रालगत असलेल्या शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतक-यांच्या शेतपिकांना योग्य मोबदला नियमित मिळावा यासाठी उपवनसंरक्षक यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना समितीच्या सदस्यांनी केली आहे.
         वन्य प्राण्यांपासून शेतपिके वाचविण्यासाठी सोलार कुंपनासह इतर उपाययोजना आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले
                                               *****


No comments:

Post a Comment