Thursday 21 April 2016

व्यसनापासून दूर राहून आरोग्य तंदुरूस्त ठेवा
- आशुतोष सलिल
·         विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू सेवन करण्याची शपथ
·         राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
   वर्धा, दिनांक 7 -  अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व देऊन दररोज मैदानी खेळ खेळावेत. व्यसनापासून दूर राहून आरोग्य तंदुरूस्त ठेवावे. आकर्षणाच्या मोहात पडता आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तंबाखूचे सेवन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.
   न्यू इंग्लिश विद्यालयाच्या सभागृह मैदानावर जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवन करण्याबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विजय व्यास यांची उपस्थिती होती.
   जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेहामुळे दृष्टी ,-हदय, किडनीवर दुष्परिणाम होतो. रक्तदाबही वाढतो, अकाली मृत्यू येतो. म्हणून प्रत्येकाने मधुमेहमुक्त समाज घडविण्यासाठी पुढे यावेबदलत्या जीवनशैलीत विशेषत: अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांनी धुम्रपानाच्या आहारी जाऊ नये. तंबाखूमुळे कर्करोग होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहावे. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळावेत. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते  त्याशिवाय व्यक्तीमत्त्व विकासात भर पडते. सर्वांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवन घडविण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
    शासकीय, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही इतरांना तसे करण्यापासून परावृत्त करेल. तंबाखू तंबाखजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणा-या दुष्पपरिणामंची मला जाणीव आहे.                                                 
मी व्यसनाच्या आहारी जाणार अथवा कुणाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. निरोगी सुदृढ आयुष्य जगेल, मी स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला देशाला व्यसनमुक्त निरोगी घडविण्याची प्रतिज्ञा करीत आहे, अशी शपथ डॉ. चव्हाण यांनी दिली.
   प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी यांनी करून त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिलयांचे पुष्पगुच्छ आणि सूतमाला देऊन डॉ. मडावी यांनी स्वागत केले
   कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, डॉ. आकरे,  श्री. रहाटे आदींसह आरोग्य विभागोच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
 0000


No comments:

Post a Comment