Thursday 21 April 2016

मॅमोग्रॅफी मोबाईल व्हॅनद्वारे महिलांच्या कर्करोगाचे निदान
Ø 3 हजार 500 महिलांची तपासणी
Ø महिला कर्मचा-यांसाठी विशेष शिबिर
Ø राज्यातील अभिनव उपक्रम
            वर्धा, दिनांक 13 – अत्याधुनिक अशा मॅमोग्रॅफी व्हॅनद्वारे महिलांच्या कर्करोगाचे निदान वर्ध्याच्या रोटरी क्लब ऑफ गांधी सिटी सावंगी मेघे येथील दत्ता मेघे इन्स्टीट्यूट मेडिकल सायन्स द्वारा करण्यात येत आहे. राज्यात नागपूर, भुसावळ, नाशिक, सटाणा, देवला, जळगाव, चाळीसगाव आणि अमळनेर येथे या अन्य एका व्हॅनद्वारे सप्टेंबरपासून 3 हजार 500 महिलांची मॅमोग्राफी करण्यात आली असून यामध्ये 35 संशयित रूग्ण आढळले तर 100 रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे.
           हरिमाला मॅमोग्राफी बस रोटरीचे गव्हर्नर महेश मोकलकर यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीत रोटरीमार्फत दिली आहे. त्या बसचा प्रशासकीय खर्च सावंगी मेघे  येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेमार्फत वार्षिक 16 लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. तसेच या बससाठी 20 केव्हीचे दोन जनित्र संस्थेमार्फत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे दत्ता मेघे यांनी दिले आहेत. मॅमोग्राफीसाठी खासगीरित्या  तपासणीसाठी अंदाजे दोन ते अडीच हजार रुपये लागतात. परंतु या सुविधेमुळे महिलांचे कर्करोगाचे निदान मोफत तपासणीद्वारे करण्यात येत आहे.
           तपासणीमध्ये कर्करोग तपासणी, घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला उपचार करण्यात येतो. लग्नानंतर पॅप्समिअरची तपासणी आणि वयाच्या 35 नंतर मॅमोग्राफी तपासणी आवश्यक असून प्रत्येक स्त्रीने दोन वर्षातून एकदा तसेच संभाव्य धोका असणा-या स्त्रियांनी मॅमोग्राफी करणे आवश्यक असल्याचे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदाराणी फुटाणे यांनी सांगितले.

                महिला कर्मचा-यांसाठी तीन विशेष तपासणी शिबिराचे आयोजन विश्रामगृहात करण्यात आले होते. यामध्ये एकूण 70 स्त्रियांची तपासणी करण्यात आली असून उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी देखील सकाळी 10 वाजल्यापासून तपासणी करण्यात येणार असल्याचे श्री. मोकलकर यांनी सांगितले.  शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment