Thursday 21 April 2016

बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करूया…’
         विश्वविक्रमी गझल निवासांच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध
              वर्धा, दिनांक 11 – बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करूयाया मराठीतील बोलाने आणि याबरोबरच जगातील इतरही भाषांमध्ये आपल्या अमोघ वाणीने महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालूयाअसा संदेश जागतिक किर्तीचे गांधीवादी, तीनदा गिनीज वर्ल्ड प्राप्त कलारत्न, तेलगू गझलचे अग्रदूत डॉ. केसरराजू उर्फ गझल श्रीनिवास यांनी  उपस्थितांना दिला.
             महात्मा गांधी संपूर्ण जगाचे नायक असून त्यांच्या मार्गावर जगाने चालणे. त्यांचे विचार अंगीकारणे  हाच प्रत्येकाच्या जीवनाचा जगण्याचा मंत्र असायला हवा, असे गौरवोद्गार डॉ. गझल श्रीनिवास यांनी महात्मा गांधींवरील भजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.
           कस्तुरबा गांधी महात्मा ज्योतीराव फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला विश्वविक्रम केलेले गझल गायक डॉ. श्रीनिवास यांनी  ‘आज की शाम महात्माओं के नामया गझल संध्या सांगितिक कार्यक्रमाद्वारे महात्म्यांना अभिवादन केले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आश्रमाच्या नई तालिम परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
         जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झालीसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, श्री. प्रसाद, श्रीमती सुषमा शर्मा, शत्रूघ्न मून आदी उपस्थित होते.
            घर घर जलाएँगे शांती की ज्योतीडगडग बसाएँगे खुशीओंकी बस्ती… , दिलोंसे दिलोतक बनाने हैं रिश्ते.. हमे धडकनो से निभाने है रिश्ते…, गांधीजींने सबको शांती, अहिंसा, सच्चाई की राह पर सिखलाया हैआदी गितांसह त्यांनी उपस्थितांना हैद्राबादपासून सेवाग्राम, सेवाग्रामपासून पोरबंदरचा प्रवास गाण्यातून उलगडला. यामध्ये त्यांनी ग्रामस्वराज्यगांधीजींचे संपूर्ण जीवन आणि संदेश त्यांच्या लोकप्रिय गितातून दिलाहर तरफ प्यार सा मोहब्बतसी हैयह जगह लग रहीं जन्नत सी हैआणि इद चाँद खो गया
है कोईजाने  किस देश जा बसा है कोईया गझलांसह कोई ताजाद ख्याल दे मौलादिल से गफलत निकाल दे मौल्ला ही सुफी गझल गायून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. महात्मा गांधीजींचा जीवन संदेश संगिताच्या माध्यमातून जगभर पोहचविण्याचा ध्यास घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना गीताद्वारे सांगितले. डॉ. श्रीनिवास यांची मुलगी संस्कृती हिनेही उत्कृष्ट गायन सादर केले. नवीन, युगंधर, मंदाल इन सच्चा यांनी साथसंगत केली.
             जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास सूतमाला अर्पण करून दीपप्रज्वलन केले. दर महिन्याला सेवाग्राम आश्रमात सांस्कृतिक,वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन होत राहावे, त्याकरीता प्रशासनाची साथ नेहमीच राहील. मीही आश्रमातील एक सदस्य असून हे आश्रम माझे दुसरे घरच झाले आहे, अशा भावना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केल्या.
        कस्तूरबा गांधींचा जीवनपट सुषमा शर्मा यांनी उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. ज्योतीराव फुले यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य पुढेही त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन चालू ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन शत्रूघ्न मून यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रसाद यांनी केले. आभार सचिव श्रीराम जाधव यांनी मानले.
          कार्यक्रमास संजय इंगळे तिगावकर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे बी.एस. मिरगे, प्रा. प्रफुल्ल दाते, विनेश काकडे, किशोर वानखेडे आदी मान्यवरांसह सेवाग्राम आश्रम परिसरातील पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, सेवाग्राम ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिकांसह परदेशी नागरिकांची बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती
         
*****


No comments:

Post a Comment