Thursday 21 April 2016

फोटो फिचर/ऐतिहासिक पर्यटन
166 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेले गिरडचे श्रीराम मंदिर
            समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे श्रीराम, लक्ष्मण सिता यांच्या संगमरवरी देखण्या मूर्त्यांसोबतच महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर आणि राम-जानकी सभागृह अडीच एकराच्या परिसरात आहे. अगोदर समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या नावाने गिरड येथे मठ होता. सन 1815 मध्ये पैठण येथून परमहंस सिताराम महाराज प्रथमच गिरड येथे येऊन त्यांनी याच परिसरात गवताची झोपडी तयार केली यामध्ये राम- लक्ष्मण सिता यांच्या लाकडी मूर्त्या तयार करून त्यांची पूजा अर्चा करण्याला सुरूवात केली. रामजन्माप्रसंगी फक्त एकत्र येऊन हा उत्सव साजरा करू लागले. त्यानंतर 1850 मध्ये जयपूर येथून राम-लक्ष्मण-सिता या मूर्त्या आणून त्यांची स्थापना करण्यात आल्याचा इतिहास आहे.
          समर्थ रामदास स्वामी गिरडला येऊन गेल्याचा इतिहास आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या नावाने असलेल्या मठाची व्यवस्था अनेक महान तपस्वींनी स्वीकारली आहे. ही गादीला गुरू शिष्य परंपरा लाभली आहे. गाडगेबाबा यांनी सुद्धा गिरडला भेट दिली असून 1954 1956 मध्ये ग्राम सफाईसुद्धा केली आहेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीसुद्धा 1961 ते 1965 पर्यंत गिरडला भेट देऊन राम जन्मोत्सवात सहभागी झाले होते.
             गिरड येथील श्रीराम मंदिर देवस्थानची व्यवस्था बबनराव तभाने गुरूजी हे पाहत आहेत. गिरड या शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. राम मंदिरामध्ये राम-सिता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या तसेच महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, हनमुामन मंदिर, राम-जानकी सभागृह तसेच मंदिराबाहेरील आकर्षक दीपमाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
*****



No comments:

Post a Comment