Thursday 21 April 2016

विश्वविक्रमी गझल श्रीनिवास आज वर्धेत
Ø गझल संध्याने महात्म्यांना अभिवादन
Ø नई तालिम परिसरात कार्यक्रमाचे आयोजन
              वर्धा, दिनांक 07 –जगातील 125 भाषांमध्ये संगीताद्वारे जनतेला महात्मा गांधीजींचा संदेश देणारे, तीनदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त कलारत्न, तेलगू गझलचे अग्रदूत डॉ. केसरराजू उर्फ गझल श्रीनिवास  रविवार, दिनांक 10 रोजी वर्धेत येत आहेत. कस्तुरबा गांधी महात्मा ज्योतीराव फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. श्रीनिवास सांगितिक कार्यक्रमाद्वारे महात्म्यांना अभिवादन ते करणार आहेत.  सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आश्रमाच्या नई तालिम परिसरात रविवार, दिनांक 10 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
            या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधीजींच्या नात उषाजी गोकाणी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांची उपस्थिती राहणार आहे. मूळचे आंध्रप्रदेशातील असलेले विश्वविक्रमी डॉ. श्रीनिवास यांच्या संगीताचा आस्वाद, मधूर स्वराची अनुभूती त्यांच्या आवाजात घर घर जलाएँगे शांती की ज्योती… , गांधीजींने सबको शांती, अहिंसा, सच्चाई की राह पर सिखलाया हैआदी लोकप्रिय गिते रसिक, गझल प्रेमींना ऐकावयास मिळणार आहेत. महात्मा गांधीजींचा संदेश त्यांनी संगिताच्या साहाय्यातून जगभर पोहचविण्याचा ध्यास घेतलेला आहे. तरी या कार्यक्रमास  बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव श्रीराम जाधव यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment