Wednesday 17 August 2011

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अल्पसंख्यांक उमेदवारांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.17 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––-------
      वर्धा,दि.17- अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी शासन पंतप्रधान योजनेचा 15 कलमी कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून येत्या सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये उमेदवारांची भरती होणार आहे. अल्पसंख्यांक उमेदवारासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम तातडीने राबविण्यात येणार असून, या प्रशिक्षणामध्ये अल्पसंख्यांक घटकाच्या उमेदवारांनी सामिल होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
     जिल्हाधिकारी सभागृहात आज अल्पसंख्यांकाच्या कल्याण समितीची आढावा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक यु.पी.जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी जगदीश संगितराव, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार सुधांसु बन्सोडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजातील पोलीस भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील आणि ज्यांचे शिक्षण 12 वी पास असेल अश्या उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक तपशिलासह ज्यामध्ये उमेदवारांचा भ्रमणदूरध्वनी क्रमांक असेल असा संपूर्ण माहितीचा  अर्ज तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री. वाघ यांच्याकडे सोपविण्यात यावा. तसेच त्यांचा भ्रमण दूरध्वनी क्रमांक 9860953287 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
   अल्पसंख्याकाच्या  शैक्षणिक सुविधेसाठी वसतीगृहाचे बांधकाम लवकरच हाती घ्यावयाचे असून, त्यासाठी जागेची निश्चितता तसेच बांधकामाचा आराखडा तातडीने सार्वजनीक बांधकाम विभाग यांच्या मार्फत तयार करुन निधीच्या प्रस्तावासह  प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मराठी भाषा बोलता व लिहता यावी. यासाठी जिल्ह्यातील 5 ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरु असून, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानामार्फत पायाभूत सुविधेचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. अल्पसंख्यांक 57 विद्यार्थ्यांना तांत्रीक प्रशिक्षणाव्दारे कौशल्याची दर्जावाढ होणार असून, आतापर्यंत या प्रशिक्षणावर 2 लक्ष रुपये खर्च झाला आहे.
या बैठकीत मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानामार्फत पायाभूत सुविधा व सुधारणा, गरिबांसाठी स्वयंरोजगार व दैनिक रोजंदारी, आर्थिक कार्यक्रमाकरीता खर्चाचे पाठबळ वाढविणे,ग्रामीण गृहनिर्माण योजनेत समनिहाय वाटा, अल्पसंख्यांक राहत असलेल्या झोपडपटट्यांच्या स्थितीत सुधारणा, जातीय घटनांना प्रतिबंधक आदि योजनांचा आढावा जिल्हाधिकारी भोज यांनी घेतला.
                     00000

No comments:

Post a Comment