Monday 15 August 2011

स्वातंत्र्यदिनी रंगला यशवंतांचा गौरव सोहळा


  महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.412                    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.15 ऑगस्ट 2011
-------------------------------------------------------------------------------              
            
     वर्धा, दि. 15 :- विविध क्षेत्रात गौरवपूर्ण कामगिरी करुन वर्धा जिल्ह्याचे नाव उंचावणारे, शेतकरी, विद्यार्थी तसेच खेळाडू यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त पालक मंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


     वर्धा जिल्ह्यात रामराव गुलाबराव बांदिले (सालोड), वसंतराव महादू पाटील (आलोडी), कोटीराम माणिराम भोंगाडे (सिंदी रेल्वे), गणपत सुपाजी भगत (येळाकेळी) आणि पुरुषोत्तम रामचंद्र भटेरो (वडगाव खुर्द) यांना राज्य शासनाने शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला आहे. त्यांचा गौरव पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जयश्री भोज, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कर्यालयातर्फे पाणलोट विकास विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार व रोख रक्कम देवून गैरविण्यात आले. पुरस्कारांची रक्कम कंसात दिली आहे. 5 ते 10 वी स्नेहल नरेश कायरकर, दिपचंद चौधरी विद्यालय सेलू, (प्रथम 1500 रु) कोमल किशोर इंदोरे, कन्नमवार विद्यालय, आर्वी (व्दितीय 1000 रु) आरुशी जोगेंद्र लोणारे, अग्रगामी हायस्कुल वर्धा (तृतीय 500 रु)
     8 ते 10 वी गट प्रेरणा अशोक घारे, अग्रगामी हायस्कुल, वर्धा (प्रथम 2000 रु), शाश्वती गजानन निवल, रत्नीबाई विद्यालय, वर्धा (व्दितीय 1500 रु), मंगेश भानुदास मोगरकर, राष्ट्रीय रामाजिक विद्यालय, वर्धा (तृतीय 1000 रु)
     5 वी ते 7 वी प्राथमिक भैरवी मानमोडे, कन्नमवार विद्यालय, आर्वी (प्रथम 5000रु) 8 ते 10 वी ऐश्वर्या मनोहर डाखोळे, दिपचंद चौधरी विद्यालय, सेलू (तृतीय 3000 रु).
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे स्वच्छतामित्र वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली मुलांच्या गटात प्रथम रत्नाकर उत्तम सिरसाट, व्दितीय शरद सुरेश देशमुख तर तृतीय कल्याणी राजेंद्र चव्हाण यांना आणि कनिष्ठ गटात अनघा नंदाने प्रथम, रेशमा वानखेडे व्दितीय तर कोमल चाफले तृतीय यांचा यात समावेश होता.
     महाशिवरात्रीच्या वेळी ढगा येथील यात्रेत लागलेली आग आटोक्यात आणण्यात मदत करणारे एन.सी.सी.अधिकारी मोहन गुजरकर तसेच संतोष तुरक, रविंद्र गुजरकर,अमोल कामडी आणि नरेश मडावी या स्वयंसेवकांचाही यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
     राज्याच्या सूवर्ण महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे जलतरणात सहभाग घेतलेल्या वैभव सनिल उईके या सुशील हिम्मतसिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांला 3 कि.मी. स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकविल्याबद्दल यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment