Wednesday 17 August 2011

ग्रामीण भागातील मुलींना संगणक प्रशिक्षण व लेडीज सायकलीचा लाभ घेण्याचे आवाहन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.17 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––-----
         वर्धा,दि.17-वर्धा जिल्हा परिषदेच्या सन 2011-12 अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे महिला व बाल विकास समितीने सन 2011-12 या वर्षात वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्याकरीता समितीने निर्णय घेतला असून,या योजने अंतर्गत सर्व लाभार्थीकडून दि. 30 ऑगस्ट 2011 पर्यंत अर्ज खालील अटी व शर्ती पुर्ण करणा-या लाभार्थीनी पंचायत समिती कार्यालयातील संबधीत गटविकास अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
     संगणक प्रशिक्षण मिळविण्यासाठी अर्जदार ही वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी.पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 50000(रु.पन्नास हजार)पेक्षा जास्त नसावे.बीपीएल मधे असल्याचे प्रमाणपत्र तहसिलदाराचे किंवा तलाठ्याचे यापैकी एक जोडावे. जाती किंवा जमातीच्या अर्जदाराने तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे, प्रशिक्षण पुर्ण करण्याबाबतचे लाभार्थीचे हमीपत्र जोडावे. लाभार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या 10 टक्के रक्कम प्रवेश घेतेवेळी निवडून दिलेल्या प्रशिक्षण केन्द्रावर भरावे लागेल. विद्यार्थींनी ही 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण झालेली असावी. एकदा निवड केलेले नांव परत बदलवून मिळणार नाही.
     लेडीज सायकल पुरविणे यासाठी अर्जदार ही वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. अर्जदार वर्ग 5 ते 9 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र जोडावे.लाभार्थींना लेडीज सायकलच्या 10 टक्के रक्कम निवड झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर भरावी लागेल. विद्यार्थीनीचे निवासस्थान यातील अंतर 2 कि.मी.चे वर असल्याचे प्रमाणपत्र शाळा मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा दाखला नसल्यास सक्षम प्राधिका-यांचा 50000 चे आतील उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल.असे जिल्हा परिषेच्या सभापती रजनी देशमुख कळवितात.
                           00000

No comments:

Post a Comment