Thursday 20 October 2011

दिवाळी साजरी करताना पर्यावरणाचा विचार करा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.20 ऑक्टोंबर 11
---------------------------------------------------------------------------------------------           
          
 वर्धा,दि.20-विद्यार्थ्यांसाठी दिवाळीचा सण जवळ आला आहे. लवकरच शाळांना सुटी लागणार आहे. सुटीत काय धमाल करावयाची याबाबत योजना तयार होत असतील. दिवाळी हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण आहे. कोणताही सण म्हटला की, ती एक आनंदाची पर्वणीच असते. त्यात दिवाही म्हणजे मिठाई, फराळ, भेटवस्तु, किल्ले , रांगोळ्या, आकाश कंदिल, फटाके इ. गोष्टी आपल्या डोह्यासमोर येतात. त्यातही प्रामुख्याने दिवाळी म्हणजे मुलांसाठी फटाक्यांचेच जास्त आकर्षण वाटते. तथापि, फटाके तयार करण्यामागील पार्श्वभूमी व फटाक्याच्या आतिषबाजीमुळे होणारे दुष्परिणाम याची फारच थोड्या जणांना माहिती आहे.
फटाके मुलांकडून असुरक्षित परिस्थितीत दिवसरात्र मेहनतीने तयार करवुन घेतले जातात. आपल्या मौजेसाठी त्यांनी विषारी वातावरणात काम करुन त्यांचे जीवन धोक्यात घालावे असे आपणास वाटते का ?
फटाके उडविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होते. फटाक्यांचा
 अवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण शक्तीवर परिणाम होतो. तसेच त्यामुळे भावनिक व मानसिक ताण वाढवून सर्वांना विशेषत: वृध्द व आजारी व्यक्तींना त्रास होतो तरीही आपण मोठ्या प्रमाणावर फटाके उडवावेत असे आपणांस वाटते का ?
        फटाके उडविल्यानंतर त्यामधुन विषारी वायु उत्सर्जित होवुन दृष्टीदोष, दमा,लजी, हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग इ. रोगांना आमंत्रण मिळते. तसेच त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदुषण होते हे प्रदुषण आपण टाळु शकतो का ?
फटाके बनविण्यासाठी मुख्यत्वे कागदाचा वापर होतो व कागदाच्या निर्मितीसाठी वृक्षतोड करण्यात येते. अशा रितीने केवळ आपल्या हौसेसाठी आपण पर्यावरणाचा विनाश करणे योग्य आहे का ?
      विद्यार्थ्यांनी सर्व बाबींचा विचार करा, मिठाई, आवडीची पुस्तके, किल्ले, रांगोळ्या, आकाश कंदिल, भेटवस्तु  आदींच्या  सहाय्याने दिवाळी साजरी करावयाची का फटाके उडवुन ? तुमचे तुम्हीच ठरावा ! गरज भासल्यास पर्यावरणपुरक व सुरक्षित दिवाळी बद्दल आई बाबांकडे हट्टही धरा.
      फटाक्यावर बंदी, जीवन आनंदी !
                                 00000

No comments:

Post a Comment