Wednesday 19 October 2011

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.19ऑक्टोंबर2011
------------------------------------------------------------------
     
वर्धा,दि.19-लिपीक नि टंकलेखक पदाच्या भरतीबाबत पूर्व परिक्षा 30 ऑक्टोंबर 2011 रोजी अग्रगामी हायस्कुल वर्धा,अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनीअर रामनगर वर्धा, जे.बी.सायन्स कॉलेज वर्धा, जी.एस.कॉमर्स कॉलेज वर्धा, लोक महा विद्यालय बॅचलर रोड वर्धा, सुशिल हिंमतसिंघका विद्यालय महिला आश्रम सेवाग्राम रोड वर्धा, रत्नीबाई विद्यालय महादेवपूरा वर्धा, न्यु ईंग्लिश हायस्कुल महादेवपूरा वर्धा,केसरीमल गर्ल्स हायस्कुल वर्धा, भारत ज्ञान मंदीरम वर्धा, अग्निहोत्री स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी रामनगर वर्धा या परिक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
     परिक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांना प्राप्त अधिकारान्वये या परिक्षा केंद्रावर पि.सी.आर. 144 कलम लागू करण्यात आले असून, 30 ऑक्टोंबर 2011 रोजी सकाळी 6 पासून ते दूपारी 4 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या 100 मिटर वरील परिसरात दोन किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रीत येण्यावर प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच झेरॉक्स, फॅक्स, मोबाईल फोन, ई-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतिबंध करण्यात आला आहे.
                       00000

No comments:

Post a Comment