Monday 17 October 2011

भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविण्याचे आवाहन


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.17ऑक्टोंबर2011
------------------------------------------------------------------
     वर्धा,दि.17- रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे बेरोजगार उमेदवारांची नांव नोंदणी करण्यात येते. या नोंदणीचे नुतणीकरण दर तीन वर्षानंतर करणे आवश्यक असते. तथापि, अनावधानाने अनेक उमेदवारांची नोंदणीचे नुतणीकरण न केल्यामुळे रद्द होऊन ज्येष्ठता संपुष्टात येते. यामुळे उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता असूनही संधीपासून ते वंचित राहतात. यावर उपाययोजना करण्यासाठी नाव नोंदणी नुतणीकरणास पात्र उमेदवारांच्या  नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर नुतनीकरण करण्यासाठी एसएमएस व्दारे अलर्ट देण्याची सुविधा रोजगार वाहिनी या वेबपोर्टलवरुन स्वयंचलितपणे दिनांक 14 सप्टेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे.
     या महिन्या व्यतिरिक्त पुढे हे एसएमएस अलर्ट दरमहा नुतनीकरणास पात्र असलेल्या उमेदवारांना नुतनीकरण कालावधीच्या शेवटच्या महिन्यात पहिल्या व विसाव्या दिवशी देण्यात येणार आहेत. उदा. उमेदवारांचा नोंदणी महिना जूलै असल्यास नूतनीकरणाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या तारखेस पहिला व वीस तारखेस दुसरा एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.              
     यापूर्वी 1 मे 2011 महाराष्ट्र दिन पासून रोजगार वाहिनी वेबपोर्टलवरुन स्वयंचलितपणे राज्यातील एकुण 45 रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातून नोकरी इच्छूक उमेदवारांची नोकरीसाठी शासकीय / खाजगी नियोक्त्यांकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांसाठी पाठवणी केलेल्या उमेदवारांना याबाबतची माहिती होण्यासाठी त्यांचे पाठवणीबाबतचा संदेश (एसएमएस)रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्याबाबत सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑगष्ट 2011 अखेर 1,10,145 एसएमएस अलर्ट पाठविण्यात आलेले आहेत.
     या विविध प्रकारच्या एसएमएस अलर्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी भ्रमणध्वनी क्रमांक , दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करावेत. यानुसार उमेदवार केव्हाही व कोठूनही  http://esemah.nic.in  या वेबसाईटवरुन उमेदवार कॉर्नर मधील माझ्या संपर्कामध्ये बदल या ऑप्शनवर क्लीक करुन करु शकतात. यासाठी उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन आयुक्त, रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास, ,वर्धा यांनी कळविले आहे.
                             00000




No comments:

Post a Comment