Tuesday 18 October 2011

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केन्द्रात प्रवेशाबाबत सुचना


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.18ऑक्टोंबर2011
------------------------------------------------------------------
     वर्धा,दि.18- सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकांना  त्यांची पात्रता तपासुन कमीत कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत असलेल्या  माजी सैनिक महामंडळाव्दारे (मेस्को) करंजे नाका, सातारा येथे सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केन्द्र चालविण्यात येत आहे. या केन्द्रात निवास व भोजनासह दिल्या जाणा-या 30 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी रुपये 4000 शुल्क आकारुन  प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणानंतर जे युवक सैन्य अथवा पोलीस दलात भरती होऊन तसा पुरावा सादर करतील त्यांना शुल्कापैकी रुपये 500 बक्षीस स्वरुपात परत दिले जातात.
     नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हा कार्यक्षेत्रातील ऊमेवारांची निवड  दि. 21 ऑक्टोंबर 2011 रोजी सकाळी 9 वाजता सैनिकी मुलांचे वसतीगृह, नागपूर येथे होणार आहे.
     सदरहु प्रशिक्षण समाजातील सर्वांसाठी उपलब्ध असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकासह हजर राहून या योजनेचा लाभ घ्यावा. चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क रक्कम रु. 200 त्वरीत भरुन त्यांनी शिबीरातील आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी समादेशक, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सातारा यांचेशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात मोबाईल क्रमांक 7588624043 किंवा 9923407653 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                         000000

                     

No comments:

Post a Comment