Wednesday 19 October 2011

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-2010


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.19 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------  
      
वर्धा, दि.19- राज्यातील सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्याकरीता दरवर्षी राज्यस्तरावर 5 विविध संवर्गात वनश्री पुरस्कार देण्यात येतात. वनेत्तर जमिनीवर वृक्ष संवर्धनास अधिक व्यापक प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने हे पुरस्कार महसुल विभाग स्तरावर व राज्यस्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत,शैक्षणिक संस्था,सेवाभावी संस्था, ग्राम/विभाग/जिल्हा या 5 संवर्गात देण्यात येतात.
      पुरस्काराचे स्वरुप महसुल विभाग स्तर प्रत्येक संवर्गामध्ये दोन पुरस्कार देण्यात येत असून प्रथम रुपये 25 हजार व व्दितीय रुपये 15 हजार  असे आहे.
      राज्यस्तरावरील प्रत्येक संवर्गामध्ये 3 पुरस्कार देण्यात येत असून प्रथम रुपये 50 हजार , व्दितीय रुपये 40 हजार  आणि तृतीय रुपये  30 हजार  असे आहे.पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात कार्य केलेले असावे.
      या पुरस्काराकरीता अर्ज करु इच्छिणा-यांनी त्वरीत आपले जिल्ह्याचे उपसंचालक,सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेशी संपर्क साधुन पुरस्कारासंबधीची माहिती व अर्जाचा नमुना प्राप्त करुन घ्यावे.दि.31 डिसेंबर 2010 अखेरचा कार्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-2010 साठीचे प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य पूर्ततेसह संबंधीत उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेकडे दि. 20 नोव्हेंबर 2011 पर्यंत पाठवावेत.
                     000000

No comments:

Post a Comment