Tuesday 18 October 2011

मान्यता प्राप्त संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित


 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.18 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------
       वर्धा, दि.18- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ,वर्धा यांचे मार्फत चर्मकार समाजातील कुटूंबामधील पात्र मुले व मुलींचे व्यावसायीक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण योजना  राबविण्यात येणार आहे.
     प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी पुढील अटी पुर्ण करीत असलेल्या संस्थांकडून प्रशिक्षण देण्याकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
     संस्थेस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई, व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, मुंबई यांचेकडून मान्यता अथवा संस्थांशी संलग्नता असावी.
      संस्था मागील सलग पाच वर्षापासून कार्यरत असावी. संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट पुर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा,यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. संस्थेकडून मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींना स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे किंवा नोकरी मिळाली आहे याचा तपशील देण्यात यावा. संस्थेस शासन मान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी मान्य असल्याचा तपशील देण्यात यावा.प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशील देण्यात यावा.प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरीता आपणाकडून कार्य कार्यवाही करण्यात येते व स्वयंरोजगार थाटण्यासाठी कोणती मदत प्रशिक्षणार्थीस करण्यात येते. याकरीता आपणाकडे कोणती यंत्रणा कार्यरत आहे. याचा तपशील देण्यात यावा.बाहेरगावच्या प्रशिक्षणार्थीसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्थे बाबत तपशील देण्यात यावा. संबधित संस्थानी दि.20 ऑक्टोंबर 2011 पर्यंत व.नि.वाघमारे,व्यवस्थापकीय संचालक रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,वर्धा यांचेकडे सादर करावे.
                       0000000


No comments:

Post a Comment