Tuesday 18 October 2011

ज्ञान भागीदारीतून शाश्‍वत कृषी विकासावर कार्यशाळा संपन्न


 महाराष्ट्र शासन

प्र.प.क्र. *     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.18ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------
                
वर्धा,दि.18-ज्ञान भागीदारीतून शाश्‍वत विकास या विषयावर दोन दिवसांची एक कार्यशाळा कृषी समृध्दी प्रकल्पाच्या वतीने सेवाग्राम येथे घेण्यात आली.कृषी विकासातील सर्व बाबींवर यात मंथन करण्यात आले.
     या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील नामांकित आणि कृषी समृध्दी प्रकल्पाच्या सहाही जिल्ह्यातील अधिकारी तसेच सहभागी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     ज्ञान व्यवस्थापन ही आजच्या काळात आवश्यक बाब बनली आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी एकत्र येवून ज्ञानाचे आदान-प्रदान केल्यास या भागीदारीतून कृषी क्षेत्रात शाश्‍वत विकास शक्य असल्याचे या कार्यशाळेत अधोरखीत करण्यात आले.
     या दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय कृषी संशोधन अनुसंधान संस्थेचे उपमहाव्यवस्थापक डॉ.टी.पी.त्रिवेदी, कृषी समृध्दी कार्यक्रमाचे अतिरिक्त कार्यक्रम संचालक अमित नाफडे तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     ज्ञान व्यवस्थापन व भागीदारी, शेतीत माती परीक्षणाचे महत्व, महिलांच्या सक्षमीकरणातील आव्हाने आदींसह अनेक विषयांवर सत्र निहाय मार्गदर्शन करण्यात आले. दुस-या दिवशी सर्वांनी एमगिरी संस्थेला भेट दिली. या संस्थेव्दारा संशोधित उपकरणांचा वापर आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करुन उपलब्धता वाढविणे याबाबत यात चर्चा झाली.
     या कार्यशाळेत नॅशनल स्पॉट एक्चेंजचे सहा.उपाध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी शेतक-यांना त्यांच्या शेतातूनच विक्री कशी करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉ.व्ही.के. म्हारोळकर तसेच डॉ.जगदीश प्रसाद, माविमचे प्रवीण बनसोड तसेच डॉ.ब्लेस डिसुझा आदींनीही यात मार्गदर्शन केले.

1 comment:

  1. really very good news regarding the implementation of Krushi Samruddhi

    ReplyDelete