Friday 21 October 2011

असंसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्याची निवड - सुदीप बंदोपाध्याय


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
-----------------------------------------------------------------------------------------------
     
वर्धा,दि.21-बदलत्या जीवन शैलीमुळे देशातील अनेक लोकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब व कर्करोगासारखे असंसर्गिय आजार बळावत असून या आजारावर नियंत्र व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी देशातील 21 राज्यामध्ये 100 जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, यामध्ये विदर्भातील 6 जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली.
     असंसर्गजन्‍य आजारावर नियंत्रण व प्रतिबंधात्मक प्रभावी उपाय योजनेसाठी वर्धा जिल्ह्यासह भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व वाशिम या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे कार्यरत आहे अथवा नाही याची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री बंदोपाध्याय आज येथील सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षाचे त्यांच्या हस्ते  उदघाटन केल्यानंतर आयोजित असलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
     यावेळी अतिरीक्त संचालक डॉ. एस.सी.गुप्ता, उपसंचालक डॉ. पवार, प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, एन.पी.सी.डी.सी.एस.च्या सल्लागार डॉ. श्रीमती राणा, डॉ.आमले व डॉ. कठाणे आदी मान्यवर उपस्थित होते.                    केंद्र शासनाने गावपातळीवर अनेक आरोग्य अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बंदोपाध्याय म्हणाले की राष्ट्रीय असंसर्गिय रोग नियंत्रण कार्यक्रम गाव पातळीपर्यंत राबवून निरोगी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहीजे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा सामान्य राग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री देण्यात आली असून, तज्ञ डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्रातील पारिचारीक व वैद्यकिय अधिका-यांना व परिचारीका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केन्द्र शासनाने पुरेशी तरतूद केली असून,  आगामी अर्थसंकल्पात अधिकची तरतूद केली जाईल असेही ते म्हणाले.
     यावेळी उपसंचालक डॉ. पवार, अतिरीक्त संचालक गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले.
     प्रास्ताविक करताना जिल्हा शल्य चिकित्सक रावखंडे म्हणाल्या की असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2011 पासून सामान्य रुग्णालयात कार्यान्वित झाला आहे. आरोग्य केंद्राना 161 ग्लूकोमीटरचे वितरण जिल्हा आरोग्य अधिका-यां मार्फत करण्यात आले असून वैद्यकिय अधिकारी व परिचारीका यांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांना संदर्भ सेवे करीता नागपूर येथे संदर्भित करण्यात येत असून पुरेसा मणुष्य बळासाठी पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.      
यानंतर राज्यमंत्री बंदोपाध्याय यांनी रुग्णालयातील संपूर्ण रुग्ण कक्षाला भेट देवून पाहणी केली तसेच रुग्णासोबत चर्चा केली. त्यांनी नालवाडी येथे उपआरोग्य  केंद्राला भेट देवून असंसर्गिक रोग नियंत्र कार्यक्रमाबाबत वैद्यकिय अधिकारी, परिचारीका यांच्या कडून माहिती जाणून घेतली.
     या कार्यक्रमाचे संचलन डॉ. जयचंद मुन यांनी केले तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी राठोड यांनी मानले.
     या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.
                   000000

No comments:

Post a Comment