Thursday 20 October 2011

पोलीस हुतात्मा स्मृती दिना निमित्ताने आदरांजली


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा,  दि.21ऑक्टोंबर 2011
----------------------------------------------------------------------------------------------
           
वर्धा,दि.21- अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आज सकाळी येथील  पोलीस मुख्यालयामध्ये हिंगणघाट येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील शहीद झालेले जवान चंद्रशेखर यांचे पिता सुरेश कोरे आई गीता कोरे व पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी शहीद स्मृती स्तंभावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
     याप्रसंगी  पोलीस उपअधिक्षक (गृह) एम.जी. नळे, पोलीस उपअधिक्षक मनोज पाटील, ठाणेदार बाबा डोंगरे, व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
     शहिद स्मृतीला उजाळा देताना आपल्या भाषणात अविनाश कुमार म्हणाले की 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचया दृष्टीने अत्यंत महत्वाचा व पवित्र असा दिवस समजला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलीस दलातील 10 शिपाई लडाख हद्दीत भारत आणि तिबेट सिमेवर व 16 हजार फुट उंचीवर दोन हजार पाचशे मैलाच्या हॉटग्रीन या सिमेवर बर्फाच्छादीत अत्यंत निर्जन कडाक्याच्या थंडीत गस्त घालीत असताना धोकादायक पध्दतीने दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहिद झाले. या दिवसाची आठवण राहावी तसेच देशामध्ये आतंकी हल्ल्यात नक्षलवादी कार्यवाहीत, समाजकंटक व हिंसक कृत्ये करणा-या कडून कर्तव्यावर असलेल्या शहीद जवानाच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो. आपल्या मातृभुमीचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्र निष्ठा ठेवून अनेक जवान शहीद होत असतात त्यांना या दिवशी कृतज्ञतापर्णू स्मरण करण्यात येते तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन अभिवादन करण्यात येत असते असेही ते म्हणाले.
     यावेळी 21 पोलीसांनी हवेमध्ये तीन राऊंड फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली तसेच पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी शहीद स्मृती स्तंभावर पुष्प वाहून आदरांजली वाहीली व अभिवादन केले. याप्रसंगी 1 सप्टेंबर 2010 ते आगस्ट 2011 या दरम्यान देशातील शहीद झालेल्या जवानांचे नावाचे वाचन पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी केले. शिस्तबध्द झालेल्या या कार्यक्रमाचे संचलन व आभार पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी केले.
                          00000
     

No comments:

Post a Comment