Tuesday 26 July 2011

लघू उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.26 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 26- लघु उद्योजकांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरस्कार योजना दर वर्षी  राबविण्यात येते. सन 2011 या वर्षात वर्धा जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणा-या उत्कृष्ट लघु उद्योजकांकरीता ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश नविन लघु उद्योजकांमध्ये प्रेरणा व उत्साह निर्माण करुन उद्योजकाला आवश्यक गुणाचा विकास करणे हा आहे. या योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर दोन पात्र उद्योजकांची निवड करण्यात येईल व त्यांना पुढील प्रमाणे पारितोषिक देण्यात येईल.
निवड झालेल्या पात्र उद्योजकांना प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये नगद रकमेसह चांदीचे मानचिन्ह व व्दितीय पुरस्कार 10 हजार रुपये नगद  व चांदीचे मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
पात्र ठरणा-या उद्योजकांसाठी निकष ठरविण्यात आले असून ज्या उद्योजकांना स्थायी लघु उद्योग नोंदणी दिनांक 31 डिसेंबर 2008 ला किंवा त्यापूर्वी मिळाली आहे व ज्याचे उत्पादन सतत दोन वर्षापासुन चालु आहे अशांनाच या योजनेचा लाभ देता येईल.
ज्या लघु उद्योजकांना पुर्वी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पुरसकार मिळालेला आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार लघु उद्योजक कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
     वर्धा जिल्ह्यातील सर्व लघु उद्योजकांनी विहीत नमुन्यात दिनांक 30 सप्टेंबर 2011 पर्यंत अर्ज करावा. अर्जाच्या  नमुन्याकरीता जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा कळवितात.
                           0000


No comments:

Post a Comment