Tuesday 26 July 2011

गुरुवारी आर्वी येथे कर्करोग मोफत पूर्वतपासणी शिबीर


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.25 जूलै   2011
--------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि.25- सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, अ.भा.ग्रामीण पत्रकार संध आणि निमा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 28 रोजी आर्वी येथे नि:शुल्क कर्करोग पूर्वतपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्वी येथील सहकार मंगल काया्रलयात सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सावंगी (मेघे) रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक व एंडोस्कोपीतज्ज्ञ डॉ. दिलीप गोडे, डॉ.मिनाक्षी येवला पाटे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नेत्रा इनामदार, मुख्य शल्यचिकित्सक डॉ. नितीन भोला हे तज्ज्ञ रुग्णांची पूर्वतपासणी करणार आहेत. शरीरावर कोणत्याही प्रकारे गाठी येणे, तोंडात फोडे येणे, सूज येणे व वेदना होणे, तोंडातून रक्त निघणे, तोंड उघडताना त्रास होणे, स्तनांमध्ये गाठी येणे, वजन वेगाने कमी होणे, शरीरावर तिळांचे प्रमाण वाढत जाणे इत्यादी लक्षणे जाणवत असल्यास कर्करोगाबाबत तपासणी करुन घेणे आवश्यक ठरते.
या शिबिरातील 20 हजारांच्या आत वार्षिक उत्पन्न असणा-या रुग्णांना कर्करोगाच्या शसत्रक्रियेसाठी शासनाच्या  जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत आर्थिक मदतही उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच शिबिरातील अन्य रुग्णांना आवश्यकता भासल्या सावंगी रुग्णालयातील मॅमोग्राफी व सोनोग्राफी या तपासण्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
कर्करोग म्हणजेच कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचाराने तो बरा होऊ शकतो, म्हणूनच या विशेष शिबिराचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे सचिव समीर मेघे, अखिल ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल जोशी, सचिव साबीर अहमद, निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष मोहोड, डॉ. हरगुण मोटवानी यांनी केले आहे.
                     00000

No comments:

Post a Comment