महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.29 जूलै 2011
------------------------------------------------------------------
वर्धा, दि.29- कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विस्तार योजनाझचक प्रकल्पास जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी भेट देवून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, क्रॉपसॅप, ठिंबक व तुषार सुक्ष्म सिंचन योजना, प्रोजेक्ट, शेतीशाळा, कृषि यांत्रिकीकरण, क्रॉपलोन, निविष्ठा इत्यादी प्रकल्पांची जिल्हाधिकारी राजश्री भोज यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच शेतावर शेतक-यांशी मनमोकळे पणाने चर्चा केली.

सदर कार्यक्रमा अंतर्गत किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ठरविणे व त्याप्रमाणे कृषि विद्यापिठाकडून आलेल्या जाहीरातीची माहिती ग्रामपंचायतमध्ये लावणे व शेतक-यांना किडीच्या नियंत्रणासाठी किडीची संख्या वाढण्या अगोदरच शेतक-यांना आवश्यक असलेल्या फवारणीचा भ्रमण दुरध्वणीवर संदेश पाठविण्यात येणार आहे.
तांभा येथे राष्ट्रीय गळीत धान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत 250 हेक्टर पर्यंत सोयाबिन प्रकल्पाची माहिती, गट प्रात्यक्षिके, शेतीशाळा, मित्र किड व शत्रु किड जैविक औषधे प्रात्यक्षिके, फेरोमेन ट्रॅप, पक्षी थांबे इत्यादी बाबी विषयी तसेच एकात्मिक किड व्यवस्थापनच्या बाबीविषयी शेतक-यांशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली व शेतक-यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
00000
No comments:
Post a Comment