Friday 29 July 2011

पावले पडली पुढे...

मंगळवार, २६ जुलै, २०११

समुद्रपूर तालुक्यातील २४९ लोकसंख्या असलेले खैरगाव, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता स्वयं सहाय्य महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली.गटाच्या संघटिका म्हणून सौ. शौभा झिबलाजी गायधने, वय ४८ वर्षे यांची निवड झाली. शिक्षणाने अशिक्षित असल्या तरी त्यांच्या मध्ये असलेली जिद्द व चिकाटी मुळे संघटन, शिक्षण व व्यवहारीक ज्ञान त्यांना गटामुळे मिळाले.अशिक्षित असल्यामुळे त्यांना वाचन करता येत नव्हते. परंतु त्यांची वाचनाची आवड बघून त्यांच्या मुलांनी त्यांना रात्रीच्या शाळेत जाण्यास सां‍गितले. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईने ४५ व्या वर्षी ४ थी पास केले. शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले.

शोभाताईने गटातून कर्ज घेऊन स्वत:च्या १२ एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला.त्यासाठी त्यांनी स्वत: व गटातील महिलांनी शेती शाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे कीटकनाशके,रासायनिक खते इत्यादीचा खर्च वाचला. शोभाताईने स्वत: गांडुळ खत, जीवामृत तयार करुन शेतीमध्ये त्याचा वापर केला.शेतीमधून निघालेल्या उत्पादनातून त्यांनी विषमुक्त अंबाडी शरबत, झुणका भाकर चा स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनीमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

गावातील तलावावर गटातील महिलांच्या सहकार्याने व स्वत: पुढाकार घेऊन बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्यादी विविध कार्यक्रम गावामध्ये पुढाकार घेऊन साजरे केले जातात. सुजाता स्वयं सहाय्यता बचत गटाच्या नावाने शेतकरी वाचनालय स्थापन केले. गावातील शेतकरी वाचनालयात जावून वाचन करतात. शोभाताईनी कृषी खात्याच्या माध्यमातून शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण इत्यादी योजनाचा लाभ घेतला. शोभाताईला वाचनाची आवड असल्याने वाचनालयातील एकही पुस्तक त्यांच्या वाचनातून सुटलेले नाही.

शोभाताईला सहलीला जाण्याची खूप आवड. गटाची सहल, कृषी खात्यामार्फत अभ्यास दौरा, तीर्थयात्रा असो, त्या नियमित दरवर्षी नवीन गावाला शहरात फिरण्यासाठी जातात. गोवा, अकोला, चिखलदरा, रत्नागिरी, मध्यप्रदेश, दिल्ली इत्यादी ठिकाणी त्या गेलेल्या आहेत.

गटामध्ये सहभागी झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, मी जे काही करते आहे, ते गटांकडून मिळत असलेल्या बळामुळे. भविष्यात गटासाठी एक व्यवसाय उभारणी करावयाची आहे. जेणेकरुन सर्व सुखी समाधानी जीवन जगेल, पण ते होईल सर्व गटांच्या प्रशिक्षणातूनच आणि त्यासाठी साथ हवी माविमची.

THANKS www.mahanews.gov.in

No comments:

Post a Comment