Saturday 30 July 2011

राज्यात सर्वप्रथम ई-चालन सुविधा बहुमान वर्धेला ई-चालान सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत - न्या. शिवणकर


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
       वर्धा,दि.30- न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्टॅम्पची खरेदी करावी लागते. या स्टॅम्पच्या खरेदी ऐवजी आता न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी ऑन लाईन ई-चालान पध्दत अवलंबविण्यात आल्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश़ अशोक शिवणकर यांनी केले.   
वर्धा जिल्हा न्यायालय परिसरात ई-चालान सेवेच्या उदघाटनाचा शुभारंभ न्यायाधिश अशोक शिवणकर यांच्या शुभ हस्ते नुकताच (25 जुलै) रोजी संपन्न झाला. याप्रसंगी न्यायाधिश दिपक ढोलकिया, न्यायाधिश समिर दास, मुख्य न्यायदंडाधिकारी डि.एच.शर्मा, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्रदिप देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
     राज्यात सर्वप्रथम ई-चालान सुविधा सुरु करण्याकरीता वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याचे सांगून न्या. शिवणकर म्हणाले कि संगणक प्रणालीच्या ऑन लाईन प्रक्रीयेमुळे यापुढे न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी विलंब होणार नाही. या कार्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडिबीआय बँक व इंडियन ओव्हरसिज बँकेची सेवा सुविधा देण्यासाठी निवउ करण्यात आली असून, या सुविधेचा वकिल मंडळींनी व पक्षकारांनी लाभ घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
     याप्रसंगी अडव्होकेट आर.एस.गुरु यांचे व्दारे अनंता पुरंदरे यांनी ऑनलाईन चालान सुविधेचा उपयोग करुन रु. 50 हजाराचया दिवाणी दाव्याकरीता 4 हजार 930 रुपयाची ई-चालानने रक्कम भरण्यात आली. या ऑनलाईन ई-चालान सुविधेची प्रकिया संगणक प्रणाली संचालक ए.एस.कुरेसी व प्रविण भगत यांनी पूर्ण केली.
     याप्रसंगी मोठ्या संख्येने वकील,पक्षकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                           0000

No comments:

Post a Comment