Friday 29 July 2011

औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करा - जिल्हाधिकारी


 महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.29 जूलै  2011
-----------------------------------------------------------------------------------
        वर्धा,दि.29- वर्धा व देवळी तालुक्यात औद्योगिकरणाचा विस्तार होत असून पर्यावरण संतूलनाच्या दृष्टीने  त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी उद्योजकांनी त्यांच्या  औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
      आज जिल्हाधिकारी सभागृहात जिल्हाधिकारी भोज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे अशोक धर्माधिकारी, उपअभियंता अरविंद भुते, क्षेत्र व्यवस्थापक आय.के. गिरी, कार्यकारी अभियंता अ.प्र. फडणविस, विवेक तोंडरे, उद्योजक भुषण वैद्य व प्रविण हिवरे तसेच खाजगी उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      वृक्ष लागवडीसाठी हा कालावधी अत्यंत पोषक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की, वृक्षारोपणाकरीता  8 ते 9 महिण्याचे रोपे खरेदी करुन त्याची लागवड करावी.वर्धा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खाजगी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करण्याची गरज असून, त्यासाठी महत्वाच्या ठिकाणाच्या जागेची निवड करण्यात यावी.
      शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पालन करुन 23 मिटरची जागा सोडून उद्योजकांनी त्यांच्या भुखंडावर लघू अथवा मोठे उद्योग उभारण्यात यावे. तसेच त्या रिकाम्या भुखंडावर वृक्षाची लागवड करावी. देवळी तालुक्याच्या औद्योगिक विकास साधताना त्या ठिकाणी मुलभूत सोयी उपलब्ध करुन देण्यात येवून सामायिक सोई सुध्दा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा. असेही त्यांनी यावेळी संबधित अधिका-यांना सुचना केल्या.
      अनेक उद्योजकांनी त्यांच्या उद्योगातील ट्रेड्सनुसार उमेदवार मिळत नसल्याची समस्या बैठकीत मांडली असता जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की, जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून उद्योजकाच्या मागणी नुसार उमेदवार पाठविण्यात यावे. तसेच भविष्यातील येणा-या उद्योगामध्ये कश्या प्रकारचे ट्रेड असतील याची शहानिशा करुन तसेच त्याचे नियोजन करुन जिल्ह्यात प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या.
      यावेळी उद्योजकांनी उपस्थित केलेल्या समस्याचे संबधित अधिका-यांनी समाधानकारक निराकरण केले.
                          00000


No comments:

Post a Comment