Tuesday 26 July 2011

भूमिजल संवर्धन पुरस्कार व राष्ट्रीय जल पुरस्कार


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.25 जूलै  2011
----------------------------------------------------------------------
   वर्धा, दि. 25- दरवर्षी प्रमाणे सन 2010 या वर्षासाठी भूमिजल संवर्धन पुरस्कार व राष्ट्रीय जल पुरस्कार जलसंसाधन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत प्रदान करण्यात येणार आहे.या  पुरस्कार संबंधात संचालक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे हे नोडल एजन्सी म्हणुन नियुक्त करण्यात आलेले आहे.
पुरस्कारासंबंधी जून 2008 च्या सुधारित मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने सन 2010 या वर्षासाठी नविन प्रस्ताव सादर करावयाचे आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी पुढील प्रमाणे चार वर्गवारी करण्यात आलेल्या आहेत.
अशासकीय संस्था (NGO) , ग्रामपंचायत, शहरी संस्था (अशा शहरात जेथे 1 लाख लोकसंख्या आहे) यांचेकरीता ज्यांनी भूजल वृध्दींगत करण्यासाठी पाऊस पाणी संकलन, लोकसहभागातून कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरण अशा नाविन्यपुर्ण योजनांचा किंवा प्रकल्पांचा अवलंब केला आहे. अशा संस्थासाठी ज्या शेतक-यांच्या सहभागाने संशोधनात्मक कार्यक्रम, तंत्रज्ञानाचा वापर अधिक क्षमतेने आणिपरिणामकारकरित्या करुन त्याचा लोकांना उपयुक्त व स्विकारात्मक होईल अशा प्रकारे योजना राबवितात.
      सहकारी संस्था करीता अशा संस्था पाऊस पाणी संकलन व जलसंधारणाच्या उपाययोजनांव्दारा पाण्याचा पुर्नचक्र (Recycle) आणि पुनर्वापर याबाबत जागरुकता निर्माण करतात आणि पाण्याच्या दुषितपणामध्ये व पाण्याच्या गुणवत्तेमध्ये उपाययोजना करुन नियंत्रण आणतात. वैयक्तिक करीता किंवा संस्थाकरीता ज्या संस्था नवनविन तंत्रज्ञान विकसित करण्यता संलग्न असतात जेणेकरुन पाऊस पाणी संकलन करण्यास जनजागृती होऊन पाण्याशी निगडीत समस्यांकरीता जनजागृती होते. भूजल पुनर्भरण त्याचा विकास किंवा त्या योजना राबविणे हेच यशस्वीतेचे चांगले उपाय आहेत.
या संदर्भातील केंद्र शासनाच्या  सविस्तर सूचना, वर्गवारी, त्यासाठीची गुणवत्ता, तालिका, विविध वर्गवारीनुसार अर्जाचा नमुना इत्यादी बाबतची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या जलसंसाधन विभागाच्या  www.mowr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 प्रस्ताव विहित अर्जात संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य पुणे 411005 यांचेकडे दि. 31 ऑगस्ट 2011 पर्यंत सादर करावयाचे आहे. त्यानंतर आलेले प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,वर्धा कळवितात.
                        00000

No comments:

Post a Comment