Friday 29 July 2011

नि:शुल्क रेफ्रिजिरेटर व एअर कंडीशनर दुरुस्ती प्रशिक्षणाचे आयोजन


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.29 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
   वर्धा, दि. 29- स्वत:चा उद्योगासाठी व शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज प्रकरणे तयार करु इच्छिणा-या  बेरोजगार युवक व युवतीकरीता  दि. 8 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2011 या कालावधीत नि:शुल्क रेफ्रिजिरेटर व एअर कंडीशनर दुरुस्ती प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र,वर्धा यांचे विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवार या प्रशिक्षणामधे भाग घेण्याकरीता उमेदवार सुशिक्षित बेरोजगार असावा म्हणजे त्याचे शिक्षण सुरु नसावे. वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. त्याचे शिक्षण किमान 10 वा वर्ग पास किंवा नापास किंवा आय.टी.आय. असावा.
याबाबत दि. 2 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी 12 वाजता बी.डी. कॉलेज, सेवाग्राम येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षणात अर्ज सादर करु इच्दिणा-या व्यक्तींनी हजर रहावे व सोबत वयाचा दाखला (टि.सी), शैक्षणिक पात्रतेचा दाखला (मार्कशिट), जातीचा दाखला, सेवायोजन कार्ड, 2 फोटो, शैक्षणिक पात्रते संबधी मुळ कागदपत्रे व सत्यप्रत सोबत आणावी. अर्ज सादर केलेल्या ऊमेदवारांनी          दि. 5 ऑगस्ट 2011 रोजी 11 वाजता कार्यरत समितीपुढे प्रत्यख मुलाखतीसाठी जिल्हा, उद्योग केन्द्र, वर्धा येथे हजर राहावे. निवड झालेल्या  प्रशिक्षणार्थींची यादी दि. 6 ऑगस्ट 2011 रोजी सुचना फलकावर लावण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना रु. 1500 महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, वर्धा व्दारे विद्यावेतन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यक्रम ऑर्गनाईझर नजमा शेख यांचे मो.क्र.9689252558 आणि  प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, वर्धा दुरध्वनी क्र.07152-244123 यांचेशी संपर्क  संपर्क साधावा.
                       0000000

No comments:

Post a Comment