Wednesday 27 July 2011

31 जूलै पर्यंत शासकीय वसतिगृह व निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन


     महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.27 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
  वर्धा,दि.27-वर्धा जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलामुलींच्या तीन नविन शासकिय वसतिगृहे व अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींकरीता एका निवासी शाळेमध्ये जूलै 2011 पासून प्रवेश देणे सुरु आहे.
या शासकिय वसतिगृहात मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी (मेघे) ता. जि. वर्धा, मुलांचे शासकिय वसतिगृह देवळी ता. देवळी जि.वर्धा व मुलींचे शासकिय वसतिगृह आष्टी ता. आष्टी, जि. वर्धा यांचा समावेश असून, निवासी शाळामध्ये अनुसूचित जातीतील मुलांची निवासी शाळा मौजा उमरी (मेघे) ता.जि.वर्धा यांचा समावेश आहे.
सदर निवासी शाळेत आणि वसतिगृहामध्ये मागासवर्गीय शालेय विद्यार्थ्यांना प्रथमत: इयत्ता 5 वी ते 7 वी वर्ग माहे जुलै 2011 पासून सुरु करावयाचे असल्याने गुणवत्ता टक्केवारी नुसार प्रवेश देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना वसतिगृहात निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश इत्यादि सुविधा विनामुलय पुरविल्या जातात.
उमरी मेघे येथील निवासी शाळेत आणि वसतिगृहात व देवळी येथील वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छीणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दि.  31 जुलै 2011 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, वर्धा सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड, हिंमतसिंगका शाळेजवळ,वर्धा येथे अर्ज करावेत.
तसेच आष्टी येथे मुलींचे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,आठवडी बाजार,आर्वी येथे दि. 31 जुलै 2011 पर्यंत अर्ज करावे. अर्जाचा नमुना वसतिगृहात सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.अनु.जाती, अनु.जमाती,विजाभज,विमाप्र व इमाव प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासकिय वसतिगृहात आणि अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी माधव झोड यांनी केले आहे.
                        00000

No comments:

Post a Comment