Tuesday 14 August 2012

अपंग व्‍यक्‍तींना राष्‍ट्रीय पुरस्‍कार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी यांच्‍याकडे अर्ज पाठवा



  वर्धा,दि.14-केन्‍द्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व अधिकारीता विभागातर्फे अपंग व्‍यक्‍तींना 2012 चे राष्‍ट्रीय पुरस्‍कार  देण्‍यात येणार आहे. या पुरस्‍कारासाठी  अर्ज मागविण्‍यात येत असून, पुरस्‍कारा संबधीचा संपूर्ण तपशिल व त्‍यासाठी  करावयाच्‍या अर्जाचा नमुना सामाजिक न्‍याय विभागाच्‍या www.socialjuspice.nic.in या वेबसाईटवर उपलबध आहे.
 अपंग व्‍यक्‍ती पुरस्‍कारासाठीचे प्रस्‍ताव 15 ऑगस्‍ट पर्यंत जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी जि.प.वर्धा यांच्‍या कार्यालयात सादर करावयाचे आहे.
      राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी उत्‍कृष्‍ट कर्मचारी स्‍वयंउद्योजक अपंग व्‍यक्‍ती, उत्‍कृष्‍ट नियुक्‍त अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्‍था, अपंग व्‍यक्‍तीसाठी कार्य करणा-या उत्‍कृष्‍ट व्‍यक्‍ती (व्‍यवसायिकासह) व उत्‍कृष्‍ट संस्‍था, प्रतीथ यश व्‍यक्‍ती, अपंग व्‍यक्‍तींचे जीवन मान सुधारण्‍याच्‍या उद्देशाने केलेले उत्‍कृष्‍ट संशोधन उत्‍पादन किंवा निर्माती, अपंगत्‍व व्‍यक्‍तीच्‍या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय, किंवा संस्‍था, अपंग व्‍यक्‍तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्‍कृष्‍ट जिल्‍हा, आत्‍ममग्‍न, मेंदूचा पक्षाघात, मंतिमंदत्‍व व बहुविकलांग व्‍यक्‍तींच्‍या कल्‍याणासाठी राष्‍ट्रीय न्‍यास अधिनियमांतर्गत कार्य करणारी स्‍थानिकस्‍तर समिती, राष्‍ट्रीय अपंग वित्‍त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्‍य यंत्रणा, उत्‍कृष्‍ट कार्य करणारा प्रौढ अपंग व्‍यक्‍ती, उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अपंग बालक, उत्‍कृष्‍ट ब्रेल छापखाना, उत्‍कृष्‍ट सहजसाध्‍य संकेतस्‍थळ असावे. असे जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                       000000

No comments:

Post a Comment