Tuesday 14 August 2012

अनुसूचित जातीच्‍या प्रवर्गासाठी निःशुल्‍क वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षण



     वर्धा, दि.14- जिल्‍ह्यातील विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्‍या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवती ज्‍यांना स्‍वतःचा उद्योग सुरु करण्‍याची व शासनाच्‍या विविध कर्ज योजनेमध्‍ये भाग घेऊन स्‍वतःचा उद्योग  करता यावा यासाठी वर्धा येथे दिनांक  27 ऑगस्‍ट ते 11 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत निःशुल्‍क वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र मार्फत करण्‍यात येत आहे. हे प्रशिक्षण जिल्‍हा उद्योग केन्‍द्र आणि समाजकल्‍याण कार्यालयाव्‍दारे प्रायोजित आहे. प्रशिक्षणात वेल्डिंग फेब्रिकेशन प्रशिक्षणा व्‍यतिरिकत व्‍यक्तिमत्‍व विकास, वेळेचे नियेाजन, बाजारपेठ पाहणी, प्रकल्‍प अहवाल, ध्‍येयसिध्‍दी प्रेरणा प्रशिक्षण, अकाऊंटिंग व्‍यवसायाची निवड कशी करावी  या विषयावर तज्ञ व अधिकारी वर्गाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
     या प्रशिक्षाणासाठी उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा, त्‍याचे शिक्षण चालू नसावे. त्‍याचे वय 18 ते 40 वर्षा दरम्‍यान असावे. 10 वा वर्ग पास अथवा नापास किंवा आय.टी.आय. असावे. उमेदवारांनी अधिक माहितीकरीता सौ. मालती अडतकर, 07152-244123 यांचेशी  संपर्क करावा. दि. 21 ऑगस्‍ट 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा उद्योग केन्‍द्र वर्धा येथे एक दिवसीय प्रशिक्षणात अर्ज सादर करु इच्छिणा-यांनी हजर राहावे व सोबत वयाचा दाखला(टी.सी.), शैक्षणिक पात्रतेचा दाखला(मार्कशिट), जातीचा दाखला, सेवायोजन कार्ड, एक फोटो झेरॉक्‍स प्रतीसह सोबत आणावे. अर्ज केलेल्‍या उमेदवारोन दि. 23 ऑगस्‍ट रोजी दुपारी 11 वाजता कार्यबल समितीपुढे मुलाखतीसाठी  जिल्‍हा उद्योग केन्‍द्र,वर्धा येथे हजर राहावे.निवड झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांची  यादी दि. 24 ऑगस्‍ट 2012 रोजी सुचना फलकावर लावण्‍यात येईल. व प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थ्‍यांना 1 हजार 500 रुपये महाराष्‍ट्र उद्योजक विकास केन्‍द्र, वर्धा व्‍दारे धनादेशाव्‍दारे विद्यावेतन देण्‍यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्‍यात येईल. असे प्रकल्‍प अधिकारी, महाराष्‍ट्र  उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा कळवितात.
                                                  0000000

No comments:

Post a Comment