Friday 17 August 2012

आठ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र - संजय भागवत


    वर्धा, दि. 17- नापिकी, तगादा व कर्जबाजारीपणा या शासनाच्‍या निकषानुसार  जिल्‍ह्यात  चवदा शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणापैकी   आठ प्रकरणे समिती सदस्‍याच्‍या  सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आल्‍या असल्‍याची  माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
         अप्‍पर जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणाची आढावा बैठक संपन्‍न झाली  त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीच्‍या सदस्‍यामध्‍ये  अग्रणी बँकेचे समन्‍वयक श्री.देवपुजारी, कृषी अधिक्षक कार्यालयाचे उपसंचालक, शेतकरी  स्‍वंयसेवी संघटनेचे प्रतिनिधी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे तसेच संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
          पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणांमध्‍ये स्‍व. पांडूरंग तुमडाम रा. केळापूर ता. वर्धा, स्‍व. पांडूरंग महाकाळकर रा. वडगांव खुर्द ता. सेलू, स्‍व. सुरेश ठोकळे रा. वाढोणा ता. आर्वी, स्‍व. गोपाल उमराव रा. सावल ता. कारंजा, स्‍व. विठ्ठल जुगनाके रा. हिवरा ता. समुद्रपूर, स्‍व. इश्‍वर मुने  रा. सावळी बु. ता. कारंजा, स्‍व. रामदास हिंगने मु.नारा ता. कारंजा, व स्‍व. विश्‍वनाथ खौशी  रा. नारा ता. कारंजा यांचा समावेश  असून, शासनाकडून  त्‍यांना आर्थिक मदत मिळणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
                                                00000

No comments:

Post a Comment