Tuesday 14 August 2012

वाढत्‍या किंमती नियमीत ठेवण्‍यासाठी गहू व तांदळाची खुल्‍या बाजारातून विक्री



     वर्धा,दि.14- राज्‍यात वाढत्‍या किंमती नियंत्रीत करण्‍याकरीता महाराष्‍ट्र शासनोन खुल्‍या  बाजार विक्री योजने अंतर्गत गहु 94.88 मे.टन व तांदुळ 8.52 मे.टन भारतीय अन्न  महामंडळा मार्फत उपलब्‍ध करुन दिलेला आहे.
      त्‍याकरीता महामंडळ, सहकारी संस्‍था, फेडरेशन, स्‍वयंसहाय्यता बचत गट अथवा इतर शासकीय किंवा निमशासकीय संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वितरीत करावयाचा आहे. तसेच राज्‍य शासनाच्‍या शैक्षणिक संस्‍था, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रियांचे वसतीगृह इत्‍यादी साठी करता येईल. त्‍याचप्रमाणे मासिक उपभोग 30 मे. टनापेक्षा गव्‍हाचे छोटे प्रक्रियादार उदा.चक्‍की, बेकरी  यांना जो प्रथम येर्इल त्‍यास प्रथम वितरण या तत्‍वावर वितरीत करता येईल.
     केंद्र शासनाचे गहु रु. 1170 व तांदुळ (कच्चा) अ प्रत रु. 1537.31, साधारण रु. 1492.54 हे खरेदी दर आहे. उपरोक्‍त  दरावर एपीएमसी चार्जेस, ऑक्‍ट्राय, वाहतूक हाताळणूक व अनुषंगीक बाबीसह समाविष्‍ट करुन विक्री दर ठरविण्‍यात येईल परंतु विक्री दर प्रति क्विंटल गहु रु. 1395  ब व तांदुळ (कच्‍चा) अ प्रत रु. 1762.31, साधारण रु. 1717.54 यापेक्षा जास्‍त असणार नाही. जिल्‍हाधिकारी यांनी निश्चित केलेल्‍या किंमतीने सदर गहु व तांदळाची विक्री करण्‍यात येईल.  नमुद केल्‍यापेक्षा जास्‍त  दराने गहु व तांदळाची विक्री करता येणार नाही. विक्री करतांना शिधापत्रिकेची आवश्‍यकता भासणार नाही. गहु व तांदुळ अनुदानीत किमतीचा फायदा सर्व सामान्‍य ग्राहकांना मिहावा हा शासनाचा मुख्‍य उद्देश असल्‍याने सामान्‍य ग्राहकांना उपलब्‍ध होईल याची  दक्षता घ्‍यावी. याबाबत दर, शर्ती व अटीची माहिती त्‍या त्‍या तालुक्‍यातील तहसिलदार यांचे कार्यालयाकडून उपलब्‍ध होईल. गहु व तांदळाची मागणी तहसिलदार यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रासह त्‍वरीत नोंदवावी. असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी, वर्धा कळवितात.
                                                 000000

No comments:

Post a Comment