Thursday, 24 November 2011

विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्‍पर्धा भंडारा येथे


    वर्धा, दि.24- विविध शालेय क्रीडा स्‍पर्धा आयोजना अंतर्गत नागपूर विभागीय स्‍तरावरील शालेय मैदानी क्रीडा स्‍पर्धेचे आयेाजन दि. 1 ते 2 डिसेंबर 2011 या कालावधीत जिल्‍हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्‍यात येत आहे.
      जिल्‍ह्यातील जिल्‍हास्‍तरीय शालेय मैदानी स्‍पर्धेत प्राविण्‍य प्राप्‍त शैक्षणिक संस्‍थानी, खेळाडूंनी उपरोक्‍त  स्‍पर्धा कार्यक्रमाची नोंद घेवून, आपले स्‍पर्धा आदेश पत्र, प्रवेशपत्र जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथून प्राप्‍त करुन घेवून दि. 1 डिसेंबर 2011 ला सकाळी 9 वाजता भंडारा येथे आवश्‍यक ओळख पत्र, कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये कळवितात.
                 0000000

No comments:

Post a Comment