Friday 12 August 2011

नि:शुल्क संगणक प्रशिक्षण शिबीर


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.12 ऑगस्ट 2011
-----------------------------------------------------------------------
                
     वर्धा,दि.12-जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवती ज्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्याची व शासनाच्या विविध कर्ज योजने मध्ये भाग घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे अश्यांसाठी वर्धा येथे दि. 25 ऑगस्ट 2011 ते 8 ऑक्टोंबर 2011 पर्यंत नि:शुल्क संगणक हार्डवेयर, सॉफ्टवेयर, नेटवर्कींग, लॅपटॉप मेन्टनन्सच्या प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राव्दारे करण्यात येत आहे.हे प्रशिक्षण जिल्हा उद्योग केन्द्र आणि समाज कल्याण कार्यालयाव्दारे प्रायोजित आहे.
प्रशिक्षणात शिकविण्यात येणारे विषया व्यतीरिक्त व्यक्तीमत्व विकास,वेळेचे नियोजन, बाजारपेठ सर्वेक्षण, बँकेचे कर्ज प्रकरण कार्यपध्दती, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आणि विविध मंडळाच्या योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल,ध्येय सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, अकाउंटींग, तसेच व्यवसायाची निवड कशी करावी या विषयांवर तज्ञ व अधिकारी वर्गाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     या प्रशिक्षणामध्ये भाग घेण्याकरीता उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा. त्याचे शिक्षण सुरु नसावे व वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. शिक्षण किमान 10 वा वर्ग पास किंवा नापास किंवा आय.टी.आय असावे.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2011 रोजी 5 वाजेपर्यंत आहे.
     अर्ज सादर करु इच्छिणा-यांनी आपल्या सोबत वयाचा दाखला,शैक्षणिक पात्रतेचा दाखला,जातीचा दाखला, सेवायोजन कार्ड, एक फोटो, या सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व सत्यप्रत आणावी.अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी दि.23 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी 11 वाजता कार्यबल समितीपुढे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा उद्योग केन्द्र, वर्धा येथे हजर राहावे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची यादी दि. 24 ऑगस्ट 2011 रोजी सुचना फलकावर लावण्यात येईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना रु. 1500 विद्यावेतन मिळणार आहे..अधिक माहितीसाठी मालती अडतकर यांचेशी संपर्क साधावे.असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी,विवेक तोंडरे कळवितात. 
                                  00000

No comments:

Post a Comment