Wednesday 10 August 2011

धेय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. - इ.झेड.खोब्रागडे


   महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.389                                                 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा         दि.10 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------------------------------------
                                               
वर्धा दि.10 - स्पर्धेच्या युगांत अभ्यासाला फार महत्व असून विद्यार्थ्यांनी सातत्‍यपूर्ण अभ्यास केला पाहिजे यशाचे शिखर फार दूर राहू नये या साठी विद्यार्थ्यांनी मनामध्ये भविष्यातील वेध घेवून व धेय समोर ठेवून निट पध्दतीने अभ्यास करावा असे आवाहन विदर्भ वैद्यानिक विकास मंडळाचे सहसचिव इ.झेड खोब्रागडे यांनी केले.
विशाल खोब्रागडे स्पृती प्रतिष्ठान, वर्धा यांच्या 19 व्या स्मृती निमित्त्याने कांरजा तालुक्यातील मासोद येथील शाहु महाराज मगासवर्गीय मुलांचे वसतीगृहांतील 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्‍य व गणवेश वाटप आणि स्थनिक विद्यालयातील शालांत परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण आज त्यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे, निवृत्त न्यायाधिश भालचंद्र सेनटक्के, निवृत्त अति. जिल्हाधिकारी सुधिर मेश्राम, क्रांती खोब्रागडे, माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिला खोब्रागडे, उपाध्यक्ष अॅड. प्रेम भिमटे, डॉ.पी.आर.धाकटे, सरपंच आनंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मागासवर्गीयांना मिळत असलेल्या शैक्षणिक सवलती जुण्या शासन निर्णयान्वये मिळत असल्याने नमूद करुन खोब्रागडे म्हणाले कि जूण्या व आजच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक खर्चात झालेली वाढीमध्ये बरीच तफावत असल्याने सुधारीत दरांने शैक्षणीक सवलती देण्याबाबत शासनाला समाजकल्याण विभागाने प्रस्ताव पाठविला होता. शासनाने गेल्या 26 जूलै रोजी शासन निर्णय काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुधारीत दराने शैक्षणीक सवलती देवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.गुटख्या सारख्या व्यसना पासून विद्यार्थ्यांना सावध राहण्यांचा सल्ला देवून ते म्हणाले की, व्यसन, व्यभिचार व भष्ट्राचारच्या सवई पासून नेहमी सावध भुमिका असली पाहिजे. ग्रामीण भागात अद्याप ही अज्ञानता आहे. ती दूरकरण्यासाठी सर्वांनी  प्रयत्न केला पाहिजे तसेच सामाजिक जाणीव ठेवून गोरगरिबांना शक्य तेवढे मदत करण्यांची भुमिका ठेवली पाहिजे चांगुलपणा हा मणूष्याच्या अंगात चांगला गुण असून तो जोपासने गरजेचे आहे. नितीमुल्य व दूरदृष्टी ठेवून गोर गरीब विद्यार्थ्यांना व समाजाला सहकार्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.
     अध्यक्ष पदावरून बोलतांना प्रा. गोडघाटे म्हणाले की, गोरगरिबांना मदत करण्याच्या संघटना समाजात अजूनही कार्यरत आहे. निस्वार्थवृत्ती जोपासून विद्यार्थ्यांसाठी कार्य करणा-या संघटना निश्चितच अभिनंदणास पात्र ठरतात. शाहू महाराजांचा वारसा, महात्मा जोतीबा फुले यांचे योगदान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीशिल कर्तत्वामुळे मागासवर्गीय समाजाला स्वाभिमानाने जगता येत आहे. त्‍यांच्या विचाराने समाजात अमुलाग्र क्रांती निर्माण झाली आहे. आज शिक्षणाचा समंध नोकरी मिळविण्यासाठी आहे असा समज सर्वत्र आहे. मात्र शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते व जबाबदारीचे महत्व पटायला लागले आहे. आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य वस्तीगृहांमधून होत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व आचार विचारांची जडणघडण महत्वाचे ठरते असेही ते म्हणाले.
     या प्रसंगी सुधिर मेश्राम यांनी त्यांचे वडील नागपूरचे महापौर सखाराम मेश्राम यांच्या नावाने 11 हजार रुपये प्रतिष्ठानला देण्याची घोषणा केली या 11 हजार रुपयांच्या ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून तिन गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षिसे देण्याचे जाहिर केले. तसेच गुणवंत पाटील यांनी सुध्दा 11 हजार रुपयाची देणगी या प्रतिष्ठानाला दिली यावेळी शाहू महाराज मागासवर्ग मुलांच्या वस्तिगृहाला दोन संगणक देण्यांत आले त्यापैकी एक संजय कोंडावार व एक शिवाणी महाजन यांनी प्रदान केला.यावेळी सवंतराव खोब्रागडे, क्रांती खोब्रागड, गुणवंत पाटील, भालचंद्र सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांच्या हितोपदेशक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक डॉ.धाकटे यांनी तर आभार अड. प्रेम किमटे यांनी मानले यावेळी क्रांती खोब्रागडे, गुणवंत पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यांत आला.
     या प्रसंगी अधिक्षक प्रदिप बागडे, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment