Tuesday 9 August 2011

किटकनाशक व शेतीला लागणारे साहित्य अनुदानावर उपलब्ध


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.9 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------
         वर्धा, दि.9- सोयाबिनवरील अळीचे नियंत्रणासाठी किटकनाशक व एचडीपीई पाईप तसेच कृषि अभियांत्रिकी योजने अंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर चलीत औजारे आदि साहित्य शासनाने अनुदानावर उपलब्ध  करुन दिलेली आहेत.
     सोयाबिन पानावरील अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक करते. अंडयातून निघालेलया उंट अळ्या प्रिाम पानाचा हिरवा भाग खरडवून खातात तर मोठ्या अळया व पानाच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात तसेच अळ्या फुलांचे व शेंगाचे सुध्दा नुकसान करतात.
     तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची साधारणत: आगस्ट महीण्यात सोयाबिनच्या पिकावर मुख्यत्वाने प्रादुर्भाव आढळतो. तंबाखुची अळी मळकट हिरव्या रंगाची असून तिच्या शरीरावर पिवळसर नारंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. अळ्या सामुहिकपणे पानाचा हिरवा पदार्थ खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. तृतीय अवस्थेतील अळ्या सोयोबीनची पाने खातात.
     केसाळ अळी लांब असून, तिची दोन्ही टोके काही तर मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारंगी केस असतात. अळ्या अधाशी व सामुहिकपणे पानाचया खालील बाजुवर राहून त्यातील हरतद्रव्य खातात त्यामुळे पाने जाळीदार होतात. तीव्र प्रार्दुभावात झाडाचे खोडच शिल्लक ठेवतात. नंतर दुस-या शेताकडे प्रयाण करतात.                   
     या तिन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर प्रकल्पा अंतर्गत व प्रकल्पा बाहेरील शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर क्विंनॉलफॉस उपलब्ध असून हे द्रावण 25 टक्के प्रवाही 2 मि.ली. प्रति लिटर पाण्यात टाकुन फवारणी करावी. ( पुर्ण किंमत रुपये  279 व 50 टक्के अनुदानावर रुपये 139.50 व वसुल पात्र रक्कम रुपये 139.50 आहे.)
     तसेच जैन कंपनीचे अनुदानावर एचडीपीई पाईप पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. (पुर्ण किंमत प्रति पाईप रुपये 455 त्यावर अनुदान रुपये 112.50 व वसुल पात्र रक्कम रिुपये 342.50 आहे) गळीतधान्य प्रकल्पातील शेतक-यांना स्प्रेपंप व पावर स्प्रेपंप लवकरच उपलब्ध होणार आहे.
     कृषि अभियांत्रीकी योजने अंतर्गत 25 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर (40 एच.पी.पर्यंत) , 50 टक्के अनुदानावर पॉवर ट्रीलर तसेच 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर चीत औजारे, पॉवर थ्रेशर व पंपसंच यासाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज घेणे सुरु आहे. यासाठी बँक कर्ज घेणे व शासना दर करारातील औजारे धेणे आवश्यक आहे. यासाठी पंचायत समितीतील कृषि अधिकारी किंवा विस्तार अधिकारी (कृषि) यांचेशी संपर्क साधावा. असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा चे आर.के.गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
                     00000






No comments:

Post a Comment