Thursday 11 August 2011

‘गौरव पत्रकारिते’चा या विषयावर सह्याद्री वाहिनीवर आज चर्चा


प्रसिध्दी पत्रक                            दिनांक :11ऑगस्ट 2011

नागपूर,दिनांक 11 : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील लोकमानस कार्यक्रमात उद्या दिनांक 12 ऑगस्‍ट रोजी गौरव पत्रकारितेचा या विषयावर  सायंकाळी 5.05 ते  6 वाजेपर्यंत चर्चा आयोजित केली  आहे.
     ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसार माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे, दैनिक नवशक्तीचे संपादक विनायक पात्रूडकर, नागपूरच्या दैनिक महासागरचे संपादक  श्रीकृष्ण चांडक आणि  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रद्धा बेलसरे  आदी  या    चर्चा सत्रात  सहभागी होतील.
     या चर्चासत्रात राज्य पत्रकार पुरस्काराचे मानकरी नागपूरच्या दैनिक हितवादचे बातमीदार अंजया राजम अनपर्थी, गोंदियाचे  लोकमत जिल्हा प्रतिनिधी नरेश गयंदू रहिले, यवतमाळ येथील दैनिक लोकमतचे बातमीदार रुपेश विश्वंभर उत्तरवार यांचेसह बालाजी तोंडे, (जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी, बीड), मुंबई येथील उर्दू टाईम्सचे वरिष्ठ प्रतिनिधी अजिज ऐजाज, अनिकेत साठे, (प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ता नासिक ), सुहास सरदेशमुख (प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ता, उस्मानाबाद), ज्ञानेश्वर बिजले, (विशेष प्रतिनिधी, दैनिक सकाळ, पुणे), सुभाष म्हात्रे (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, अलिबाग) आणि लुमाकांत नलवडे (बातमीदार, दैनिक सकाळ, कोल्हापूर) हे विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत.
     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान आणि लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या घेतलेल्या मुलाखती  कार्यक्रमा दरम्यान ऐकविल्या जातील.
या कार्यक्रमाचे निर्माते दूरदर्शनच्या लोकमानस कार्यक्रम ‍िनर्माते  जयू भाटकर असून सूत्रसंचालन नरेंद्र बेडकर करणार आहेत. या कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण रविवार,दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी  11  वाजता  होईल.
                     0000000

                                    

No comments:

Post a Comment