Monday 16 May 2016

सेवादूत प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल
                                -सुधीर मुनगंटीवार
§  जिल्हाधिकारी कार्यालयात सेवादूत प्रकल्पाचे उद्घाटन
Ø  अभ्यागत कक्षामध्ये डिजिटल योजनांची माहिती
Ø  जनतेला सहज सुलभ सुविधा
वर्धा, दिनांक 6 – जिल्हातसेच तालुकास्तरावरील महसूल कार्यालयात येणा-या सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच महसूल विभागाचे संबंधित आवश्यक दस्ताऐवज सहज सुलभपणे उपलब्ध देण्यासाठी सहाय्यभूत ठरणा-या सेवादूत प्रकल्पाचे उद्घाटन अर्थ नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवादूत प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या विशेष काऊंटरचे तसेच अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल,अति. जिल्हाधिकारी दीपक नलवडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आदी उपस्थित होते.
         सरकारी काम चार दिवस थांब याप्रमाणे सर्व सामान्य जनतेत असलेली भावना दूर करणारा सेवा दूत प्रकल्प जनतेला शासनाच्या सेवा अधिक जलदपणे उपलब्ध करून देणार असल्याने तसेच राज्यातील अशा प्रकारचा अभिनव प्रकल्प असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
अभ्यागत कक्षामध्ये डिजीटल पद्धतीने योजनांची माहिती नागरिकांना हवी असलेले दस्ताऐवज त्यासाठी लागणारा कालावधी याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री इंटरर्नशीप योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी नियुक्त झालेले तुषार तडस यांनी तालुका जिल्हा कार्यालयात राबविण्यात येणा-या योजनांचे मुल्यमापन करून अधिक सुलभपणे योजनांचा लाभ कसा पोहचविता येईल, यासाठी सर्वेक्षण केले आहे.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सेवादूत प्रकल्प जनतेला सुविधा उपलब्ध करून देणारा अत्यंत उपयुक्त प्रकल्प असून शासन आणि जनता यामधील अंतर निश्चितपणे कमी होईल. प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय महसूल कार्यालय तहसील कार्यालय, स्वतंत्र डेस्क तयार करण्यात आला आहे. यामध्ये 20 प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
जनतेला सेवा मिळविण्यासाठी होणारा त्रास, वारंवार चकरा मारणे, मध्यस्थांचा प्रार्दुभाव दूर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

                                                                                0000

No comments:

Post a Comment