Monday 16 May 2016

रायफल,पिस्‍टल शुटींग प्रशिक्षण शिबिराचे
              खासदार रामदास तडस यांच्याहस्ते उद्घाटन
        वर्धा,दि.6 – रायफल व पिस्‍टल शुटींग उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असून या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी खासदार रामदास तडस यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर,  भाजपा जिल्हाध्‍यक्ष राजेश बकाने, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, छत्रपती पुरस्कार प्राप्त सुरेश बोंगाडे, नंदिनी बोंगाडे, मदन चावरे यांची उपस्थिती  होती.
            जिल्‍हा क्रीडा संकुल  वर्धा येथे जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन व राफल व पिस्‍टल शुटींग असोसिएशन वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने जिल्‍हा क्रीडा संकुल येथे अद्ययावत शुटींगरेंज तयार करण्‍यात आलेली आहे. एकूण 80 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. सैन्‍य दलातील निवृत्‍त सैनिक प्रशिक्षक म्‍हणून काम पाहत असून सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्‍यात आलेले आहे. तसेच याच कार्यालयाच्‍या माध्‍यमातून जिल्‍हा क्रीडा संकुल वर्धा येथे बॉक्सिंग, सॉफ्टबॉल,बॉस्‍केट बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, कराटे, सेल्‍फ डिफेंस या खेळाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर यशस्‍वीतेसाठी या करीता  उत्‍कृष्‍ट खेळाडू तयार करण्‍याकारीता उपसंचालक सुभाष रेवतकर यांचे मार्गदर्शनात माजी सैनिक विवेक ठाकरे, किशोर घोडखांदे, अरुण अस्‍ती, भानुदास सोमनाथे, श्‍याम परसोडकर, विपिन मोघे, श्री.नागपूरे, श्री. बुटे, संतोष जोशी व अमोल वनकर पुढाकार घेत आहेत.                        

*********

No comments:

Post a Comment