Monday 10 October 2011

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत 13 ऑक्टोंबर रोजी


   महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.   543      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.10 ऑक्टोंबर 2011
----------------------------------------------------------------------------- 
वर्धा,दि.10- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वर्धा येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2012 मधील विविध आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे.
     निर्देशानुसार यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्यातील महिलांसाठी ठेवायच्या राखीव जागा तसेच मागासवर्ग व त्यातील महिलांच्या राखीव जागा आदींसाठी ही सोडत काढली जाईल. वर्धा जिल्हा परिषदेच्या राखीव जागांसाठी विकास भवन सभागृह वर्धा येथे गुरुवार 13 रोजी सकाळी 11 वाजता सोडतीस सुरुवात होणार आहे.
     जिल्ह्यामधील आठ पंचायत समित्यांमधील या सोडती त्या त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात गुरुवार 13 रोजीच सकाळी 11 वाजेपासून काढल्या जाणार आहेत असे जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी कळविले आहे. या सोडतीसाठी नागरिकांना उपस्थित राहता येईल.

No comments:

Post a Comment