Thursday 4 October 2012

घरात शौचालय, दारात पाणी ही संकल्‍पना प्रत्‍येक गावात पोहचवा - शेखर चन्‍ने


 पाणी  स्‍वच्‍छता मिशन जागृती  मोहीमेचा शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – घरात शौचालय, दारात पाणी  ही संकल्‍पना प्रत्‍येक कुटूंबापर्यंत पोहचविण्‍यासाठी  प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबवा अश्‍या सुचना  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज दिल्‍यात.
          देवळी  तालुक्‍यातील डिकडोह या गावापासून  निर्मल भारत अभियान व जिल्‍हा पाणी स्‍वच्‍छता मिशन जागृती मोहीमेचा  शुभारंभ मुख्‍य कार्यपालन अधिकारी यांच्‍या हस्‍ते  झाला.  त्‍याप्रसंगी  मार्गदर्शन करताना ते बोलत होत.
           कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ  ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, पंचायत समिती सभापती  श्री. धांडे , जिल्‍हा परिषद सदस्‍य सर्वश्री कोरके, श्री. ताडाम, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आर.एम.भुयार उपस्थित होते.
            वर्धा जिल्‍हा निर्मल भारत अभियाना अंतर्गत हागणदारी मुक्‍त  करण्‍यासाठी  जनजागृती मोहीम राबविण्‍यात येत असून, पाण्‍याची  स्‍वच्‍छता  राखण्‍यासाठी प्रतयेक गावात  शंभर टक्‍क्‍े   शौचालयाचे  बांधकाम करण्‍यासाठी  विविध योजनेमधून   सहाय्य  व मार्गदर्शन देण्‍यात येत आहे. निर्मल अभियानामध्‍ये  महिलांनी  जागृतपणे  आपला सहभाग वाढवावा असे आवाहनही त्‍यांनी  यावेळी  केले.
       अध्‍यक्ष भाषणात जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष   नाना ढगे यांनी  भारत हा कृषीप्रधान देश असल्‍यामुळे  खेड्यातच भारत वसला आहे. परंतू  मुलभूत सुविधांच्‍या अभावी अस्‍वच्‍छतेचा    अभाव  असून  ग्रामस्‍थांनी      लोकसहभागातून  आपल्‍या गावांचा विकास करावा आणि  प्रत्‍येक   घरात   शौचालय बांधावे  असे आवाहनही  त्‍यांनी यावेळी केले.
            महिलांचा  स्‍वयंस्‍फूर्त  सहभाग  असल्‍यामुळे  हागणदारी मुक्‍तीचा संकल्‍प सहज शक्‍य  असल्‍याची  ग्‍वाही यावेळी लोकप्रतीनीधी व ग्रामस्‍थांनी   दिली. गुरुदेव सेवा मंडळाच्‍या सहभागाने  प्रभातफेरी काढून  किर्तनाच्‍या   माध्‍यमातून स्‍वच्‍छतेसंबधी   प्रबोधन करण्‍यात आले.  
            प्रारंभी  राष्‍ट्रसंत  तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतीमेस पुष्‍पहार अर्पण करुन निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ झाला.
            यावेळी  उपविभागीय अभियंता  श्री. बेले , श्री. शेंडे, बढीये, गायकवाड, गजघाटे, बिडवाईकर,गटसंशोधन केन्‍द्राचे कर्मचारी सर्वश्री राहूल चावके,अतुल भांदककर, अभिषेक सावळकर, श्री. गायधने व श्री. पाटील यांनी निर्मल भारत  अभियान यशस्‍वी   करण्‍यासाठी   सहकार्य केले.
            कार्यक्रमाचे संचलन सचिन हुंगे यांनी  तर आभार ग्रामसचिव श्री.रुद्रकार  यांनी मानले.
                                                  000000 

No comments:

Post a Comment