Thursday 4 October 2012


                                निर्मल भारत यात्रेचा आज शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – निर्मल भारत अभियाना अंतर्गत  भारत स्‍वच्‍छता व दररोज साबुनने हात धुण्‍याची  सवय या संदर्भात जागृती  निर्माण करण्‍यासाठी  वाश युनायटेड आणि क्विकसैंड डिजाइन स्‍टूडिओ  यांच्‍या  सहाय्याने   निर्मल भारत यात्रा  सुरु होत असून,  उद्या  शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर पासून  सेवाग्राम येथून  या यात्रेचा शुभारंभ होत आहे.



          महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश आदी राज्‍यातून  दोन हजार किलोमीटरच्‍या प्रवासात विविध गावांमध्‍ये  शौचालय व  स्‍वच्‍छतेबाबत  याबाबत  जागृतता  निर्माण करण्‍यात  येणार आहे. या यात्रेचा समारोप  19 नोव्‍हेंबर रोजी विश्‍व शौचालय दिवशी  बिहार राज्‍यातील   बेतीया येथे होणार आहे. महाराष्‍ट्र  , राजस्‍थान, उत्‍तर प्रदेश, बिहार  या राज्‍यातील ग्रामीण भागात  शौचालय तसेच स्‍वच्‍छतेचा प्रसारासाठी  क्रीडापटू  व्‍हॉलीवुडच्‍या  नायिका तसेच प्रभावशाली व्‍यक्‍तींचाही यासाठी सहभाग राहणार आहे.  निर्मल भारत अभियानाव्‍दारे  जागरुकता निर्माण करण्‍यासोबतच  सुलभ शौचालय, शौचालयाचा उपयोग, प्रत्‍येक  घरामध्‍ये शौचालय, वैयक्तिक स्‍वच्‍छता   आदीबाबत विविध उपक्रमाव्‍दारे  माहिती देण्‍यात येणार आहे.
          निर्मल भारत  यात्रेचा शुभारंभ  केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश,  राज्‍याचे पाणी  पुरवठा व स्‍वच्‍छता  मंत्री प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे व पालकमंत्री  राजेंद्र मुळक, राज्‍यमंत्री रणजीत कांबळे आदींच्‍या प्रमुख उपस्थितीत  होत आहे.
          हा कार्यक्रम सेवाग्राम येथील हेलीपॅडवर  उभारण्‍यात आलेल्‍या  निर्मल भारत मेळाव्‍यात  होणार आहे.
                                                            0000000

No comments:

Post a Comment