Wednesday 3 October 2012

प्रत्‍येक शाळांमध्‍ये शौचालय व पिण्‍याचे पाणी ; शिक्षणाधिका-यांकडून अहवाल मागविणार - प्रा.लक्ष्‍मणराव ढोबळे


              ·        भारत निर्मल योजनेचा आढावा
·        नारा योजनेचे काम तात्‍काळ पूर्ण करणार  
वर्धा दि. 3 – शाळा  व अंगणवाड्यामध्‍ये शौचालय व पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा तात्‍काळ उपलब्‍ध करुन यासंबंधीचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडून घेण्‍याच्‍या सूचना राज्‍याचे पाणी पुरवठा   व  स्‍वच्‍छता मंत्री प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे यांनी आज दिल्‍यात.
     शासकीय विश्राम गृह येथे वर्धा जिल्‍ह्यातील पाणी पुरवठा योजना, भारत निर्माण योजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई,शौचालय योजना आदी योजनांचा आढावा प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे यांनी घेतला त्‍यावेळी  अधिका-यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
 कारंजा तालुक्‍यात उन्‍हाळ्यात पाणी टंचाई असलेल्‍या गावांचा आढावा घेतांना प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे म्‍हणाले की, नारा-22 ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे.परंतु या योजनेमधून  शेवटच्‍या गावापर्यंत पाणी पोहचू शकत नाही  अशी ग्रामस्‍थांची तक्रार आहे त्‍यामुळे  या योजनेचा सुधारीत प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या  सुचना दिल्‍यात.  
यावेळी जिल्‍हा परिषदेचे  अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे, मुख्‍य कार्यकारी  अधिकारी शेखर चन्‍ने,उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले, ग्राम विकास विज्ञान केंद्र दत्‍तपुरचे समिर कुर्वे, सुनिल राऊत, माजी आमदार वसंतराव कार्लेकर, अनिल मेघे, कार्यकारी अभियंता विजय जगतारे, डी.एल. बोरकर, कनिष्‍ठ भुवैज्ञानिक महाजन उपस्थित होते.
बोरधरण  परिसरातील गावात  उन्‍हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी तेथे पाण्‍याच्‍या टाकीचे बांधकाम करण्‍यात  येईल. तसेच कोरा, मांडगांव व डोंगरगांव येथील पाणी पुरवठ्याच्‍या समस्‍ये बाबत तातडीने प्रस्‍ताव सादर  करा. अश्‍या सुचना यावेळी त्‍यांनी  दिल्‍यात.
यावेळी शिवकालीन पाणी पुरवठा, सौर ऊर्जा, सिमेंट बंधारे, दारिद्रय  रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील  लोकांना  सौचालय बांधण्‍यासाठी  मिळणारे अनुदान तसेच भारत निर्मल अभियान योजनेचा आढावा घेण्‍यात आला. महाराष्‍ट्रात  15 ऑक्‍टोंबर पासून ही योजना सुरु होत असून, योजनेचा आराखडा तयार करण्‍याची जबाबदारी समिर कर्वे यांच्‍याकडे  सोपविण्‍यात आली आहे.
वर्धा जिल्‍ह्यातील ग्रामीण पाणी टंचाई आराखडा व अंमलबजावणी बाबतची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी दिली.
  यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.    
                                            0000000                       

No comments:

Post a Comment